राकेश झुनझुनवाला या गंभीर आजाराचे बनले शिकार; होती अब्ज कोटींची संपत्ती

मुंबई | शेअर मार्केटच्या दुनियेतील एका दिग्गज व्यक्तीचे निधन झाले आहे. या व्यक्तीने आजवर शेअर मार्केटमध्ये नेहमीच मोठी खेळी केली. कधी कोणते शेअर पडणार कोणते वाढणार याचे गणित त्यांच्याकडे पक्के असायचे त्यामुळे त्यांना शेअर मार्केटचा बिग बूल म्हटले जात होते. राकेश झुनझूनवाला यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने शेअर मार्केट मधील अनेक व्यक्तींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. काल रात्री त्यांची तब्येत आणखीन बिघडली त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले गेले. इथे डॉक्टरांची एक संपूर्ण टीम त्यांना वाचण्यास शर्थीचे प्रयत्न करत होती मात्र आज त्यांच्या निधनाची माहिती समोर आली.

शेअर मार्केटच्या या जादूगाराचा जन्म ५ जुलै १९६० रोजी तेलंगणा येथे झाला होता. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय मुंबईत आले आणि इथेच स्थायिक झाले. साल1985 मध्ये त्यांनी सिडनहॅम महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. राकेश हे एक चार्टर्ड अकाऊंटर होते. मात्र नंतर त्यांनी शेअर मार्केट क्षेत्रात पदार्पण केले. ते नेहमीच मार्केटमध्ये मोठी रक्कम इन्वेस्ट करायचे. त्यामुळे अनेक व्यक्ती त्यांना फॉलो करत होत्या.

वॉरन बफे म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश यांची एअर इंटरप्रायजेस नावाची एक स्वतंत्र कंपनी होती. ते स्टॉक ट्रेंडीग ही कंपनी देखील चालवत होते. अकासा एअर या एअरलाइनचा त्यांच्याकडे मालकी हक्क देखील होता. यात जास्त नफा नाही तरी देखील त्यांनी ही कंपनी सुरू केल्याने त्यांना त्यावेळी अनेकांनी वेगवेगळे प्रश्न विचारले होते.

त्यावेळी ते म्हणाले होते की, ” मला आपल्या भारतासाठी अपयश आले तरी कसलीच चिंता नाही. मी प्रत्येक आव्हानात्मक गोष्ट करायला तयार असतो.” त्यांनी आजवर अनेक गोष्टीत पैसे गुंतवले. यातील शेअर मार्केटमध्ये ते नेहमीच क्रमांक एकवर टिकून राहिले.

आज त्यांचे ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना किडणीच्या समस्या होत्या. यावर ते अनेक दिवसांपासुन उपचार घेत होते. तसेच त्यांना मधुमेहाचा देखील खूप त्रास होत होता. या अशा वेगवेगळ्या आजारांनीच त्यांचे निधन झाले आहे. असे डॉक्टर म्हणाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *