नि:शब्द! आई – वडिलांना दोषी ठरवून तरुणाची आत्महत्या; कारण पाहून धक्काच बसेल

मुंबई | देशातील मृत्यूचे प्रमाण सध्या वाढले आहे. यातील बहुतांश मृत्यू हे तरुणाईचे होत असताना दिसत आहे. विशेष म्हणजे अपघातात किंवा आत्महत्या या करणामधून हे मृत्यू होत आहेत. आपल्या देशासाठी ही एक खूप मोठी चींतेची बाब आहे. तरुणाईमध्ये सध्या नैराश्य खूप जास्त वाढले आहे.

प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी असा हट्ट तरुणाई करते. हे हट्ट पूर्ण न झाल्यास त्यांचा त्रागा इतका वाढतो की, ते स्वतःच्या जिवाचीही पर्वा करत नाहीत. अशाच धक्कादायक प्रकार एका युट्यूबरने केला आहे. त्याने आतम्हात्या करून स्वतः च जिवन संपवलं आहे. त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सी धिना असे या तरुणाचे नाव असून तो फक्त २३ वर्षांचा होता. SELFLO या नावाचे त्याचे युट्यूब चॅनल होते. त्याने यावर आत्महत्या करण्याआधी एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. पोलीस यांच्या हाती लागली आहे. स्पष्ट होत आहे की हा तरुण खूप निराश्यात होता. त्यामुळे त्याने राहत्या घराच्या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावरून उडी घेत जीव दिला आहे.

सुसाईड नोट मध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” माझे आई-वडील मला समजून घेण्यासाठी अपयशी ठरले. ते मला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकत नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे” त्याचीही ऑनलाईन सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. सदर युवक आयआयटी मध्ये शिक्षण घेत होता. सध्या त्याचा मृतदेह उस्मनीय जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे.

हैदराबाद शहरातील सैदाबादी या परिसरामधील कांती नगर कॉलिनीमध्ये ही घटना घडली. सदर परिसरातील पोलीस ठाण्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. सदर युवकाचे जे युट्युब चॅनेल होते त्यावर ती त्याला हवा तसा प्रेक्षकवर्ग मिळत नव्हता. त्याची मेहनत सुरू होती मात्र त्याला घवघवीत प्रसिद्धी हवी होती.

जी मिळवण्यासाठी त्याला बराच काळ आणखीन मेहनत करावी लागणार होती. या सर्व गोष्टी आणि आई वडिलांविषयी त्याच्या मनात असलेले नैराश्य हे सर्व व्यक्त करत त्याने त्याच्याच youtube चैनल वरती एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर त्याने इमारतीवरून उडी घेतली. ही आत्महत्या असली तरी सदर घटनेबाबत पोलिसांनी कलम १७४ अंतर्गत ही केस दाखल केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *