साऊथ चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

केरळ | भाबीजी घर पर है! या मालिकेत मलखानची भूमिका साकारणारा अभिनेता दीपेश भानचे नुकतेच वयाच्या 41 व्या वर्षी निधन झाल. तरुण अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहते अजूनही स्तब्ध आहेत आणि त्याच दरम्यान आणखी एका अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आलीय. या अभिनेत्याच वयाच्या 37 व्या वर्षी निधन झाल.

मीडिया रिपोर्टनुसार, केरळमधील युवा अभिनेता सरथ चंद्रनचे वयाच्या 37 व्या वर्षी शुक्रवारी निधन झाल. ‘अंगमली डायरीज’ या चित्रपटासाठी तो प्रसिद्ध होता. सरथ चंद्रन हा मल्याळम अभिनेता होता. ‘अंगमली डायरीज’, ‘कुडे’, ‘ओरू मेक्सिकन अपराथा’ हे त्याचे लोकप्रिय चित्रपट आहेत.

मूळचे कोचीचे असलेले सरथ चंद्रन यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी खूप संघर्ष केलाय. अभिनयापूर्वी सरथ एका आयटी फर्ममध्ये काम करायचे. एका आयटी फर्ममध्ये काम करण्यासोबतच सरथने डबिंग आर्टिस्ट म्हणूनही चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘अनिस्या’ या चित्रपटातून केली.

या अभिनेत्याने अखेरची भूमिका 2017मध्ये मल्याळम ॲक्शन-ड्रामा चित्रपट अंगमली डायरीजमध्ये केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन लिजो जोस पेलिसरी यांनी केले होते. या चित्रपटात अँटोनी वर्गीस, रेश्मा राजन आणि बिन्नी रिंके बेंजामिन यांच्याही भूमिका होत्या.

आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय – 29 जुलै रोजी सरथ चंद्रन यांचा मृतदेह त्यांच्या घरातून सापडला. सरथ चंद्रनच्या घरातून पोलिसांना सुसाईड नोट सापडली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या चिठ्ठीत त्यांच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही,अस लिहिल. ही चिठ्ठी पाहून पोलिसांनी दिवंगत अभिनेता नैराश्यात असल्याची भीती व्यक्त केली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *