आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मुलानं पाण्यात मारली उडी; त्याला वाचविण्यासाठी त्याने ही मारली उडी, अन् जे घडलं ते पाहून धक्काच बसेल

उन्नाव | उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे नानामाऊ येथे विधी तसेच अंतयात्रा केल्या जातात. आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचा मुलगा आला होता. अशावेळी त्यान गंगा नदीत उडी मारली. अशावेळी त्याला वाचवण्यासाठी भाऊ मिंटून उडी घेतली. थोड्या वेळानंतर त्या दोघांचाही पत्ता लागला नाही. त्यानंतर कमलेश यांच्या मुलांनी उद्या घेतल्या. पाणबुड्यांनी कमलेश आणि त्यांच्या भावाला सुरक्षित बाहेर काढलं. पण कमलेश यांच्या दोन्ही मुलांचा शोध अजूनही लागलेला नाही.

रुरी सादिकपूर गावातील राजा पासी यांच्या पत्नीचं निधन झालं. नानामऊ घाटावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय, नातेवाईक जमले. याच दरम्यान महिलेचा लहान मुलगा कमलेशनं गंगा नदीत उडी मारली. तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा मोठा भाऊ मिंटू नदीत झेपावला. नदी खोल असल्यानं दोघे बुडू लागले. काका आणि वडील बुडत असल्याचं पाहून घाटावर उभे असलेले कमलेश यांचे मुलगे, आकाश आणि राकेश यांनी पाण्यात उड्या घेतल्या. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त होता. त्यामुळे ते वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. पाणबुड्यांच्या मदतीनं मिंटू आणि कमलेश यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. कमलेश यांच्या मुलांचा शोध सुरू आहे. अनेक तास त्यांचा शोध घेतल्यानंतरही त्यांचा शोध लागलेला नाही.

काय म्हणाले ए एस पी ?:
बांगरमाऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या आईचा मृत्यू झाला. घरातील सर्वजण अंत्यसंस्कारासाठी गेले होते. नानामऊ घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी महिलेच्या एका मुलानं पाण्यात उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ नदीत झेपावला, अशी माहिती एएसपी शशी शेखर सिंह यांनी दिली. दोघांना वाचवण्यासाठी त्यांच्याच कुटुंबातील सख्ख्या भावांनी उड्या मारल्या. त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यांचा शोध सुरू आहे असं सिंह यांनी सांगितलं

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *