कधी रस्त्यावर विकले पेन तर कधी केले हे काम; जॉनी लिव्हर यांचा खडतर प्रवास पाहून डोळ्यात पाणी येईल

पुणे | जॉनी लिवर या विनोदी अभिनेत्याने आजवर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. आपल्या दमदार अभिनायने ते नेहमी सगळ्यांना खळखळून हसवत आले आहेत. मात्र या विनोदी अभिनेत्याच्या आयुष्यातील सुरुवातीचा प्रवास हा फार खडतर होता. खूप कमी व्यक्तींना त्यांचा संघर्ष माहिती आहे. त्यामुळे या बातमीमधून यांच्या संघर्षाची माहिती घेऊ.

जॉनी लिवर यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत भन्नाट विनोद केले आहेत. त्यांचं विनोदाचं पक्क टायमिंग आज त्यांना प्रसिद्धीच्या मोठ्या शिखरावर घेऊन गेलं आहे. मात्र तरी देखील जॉनी आपल्या जुन्या दिवसांना विसरले नाहीत.

जॉनी हे एका गरीब कुटुंबात वाढले. घरी अभिनयाचा काहीच लवलेश नव्हता. मात्र तरी देखील आपल्या हिमतीवर त्यांनी यशाचे शिखर गाठले. त्यावेळी ते कळत्या वयात आले तेव्हा त्यांना घरची परिस्थिती बघवत नव्हती. त्यामुळे त्यांनी एक व्यवसाय सुरू केला.

ते रस्त्यावर फिरत पेन विकत होते. यावेळी पेन सहज दुकांनामध्ये उपलब्ध होतं होता. मात्र जॉनी पेन विकायला आले की, त्यांचे पेन दुसऱ्याच मिनटाला संपून जायचे. कारण त्यांच्याकडे मार्केटिंगची एक वेगळी जादू होती. पेन घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्याकडे एक विनोद असायचा किंवा गाणं असायचं. यातून ग्राहकांचं मनोरंजन व्हायचं त्यामुळे त्यांच्या पेनाची विक्री पटापट व्हायची.

एका मुलाखतीत बोलत असताना त्यांनी त्यांचा एक दुःखद प्रसंग सांगितला होता. ते म्हणाले की, “माझ्या आयुष्यातले ते दोन दिवस मी कधीच विसरणार नाही. कारण माझे बाबा खूप आजारी होते. मला त्यांच्याजवळ थांबायचे होते. मात्र त्यावेळी दुसऱ्या दिवशी माझा शो होता. त्या भयानक दुःखद प्रसंगी मी विनोदी अभिनयाची प्रॅक्टिस करत होतो..” हा प्रसंग सांगत असताना ते भाऊक झाले होते.

जॉनी यांनी काही काळ हिंदुस्तान लिवरमध्ये देखील काम केले. यावेळी ते त्यांच्या मित्रांना चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका करून दाखवत होते. यावेळी अभिनय करत असताना काही मित्रांनी त्यांना बॉलीवूडमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र काहीच माहिती नसल्याने त्यांनी पुढे काही कॉमेडी शोमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांच्या मित्रांनीच त्यांना जॉनी हे नाव ठेवले होते.

ते अनेक कार्यक्रमात जाऊन लोकांना मिमिक्री करून दाखवत होते. त्यांची विनोदी मिमिक्री पाहून अनेक जण पोट धरून हसायचे. अशात एक दिवस सुनील दत्त ज्या कार्यक्रमात आले होते तिथे जॉनी कॉमेडी करत होते. सुनील यांना त्यांची कॉमेडी खूप आवडली. त्यांनी लगेचच त्यांना बोलवले आणि सांगितले की, “दर्द का रिश्ता” या चित्रपटात एक रोल आहे तो तू करणार का? यावर जॉनी यांनी लगेचच हो असे उत्तर दिले. तेव्हा पासून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *