काय तरी चावल्याचा भास झाला, अन् काही वेळात लहान चिमुकली सोबत विचित्र घडलं; वाचून धक्काच बसेल

कणकवली | महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात लहान मुलांना सर्प दंश केला असल्याच्या दोन वेळा घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना कणकवली तालुक्यातील वागदे या गावात घडली आहे. या गावातील केंद्रशाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मण्यार जातीच्या सर्पान दंश केलं. ही घटना दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास घडली. स्वरा संतोष घाडीगावकर अस त्या विद्यार्थिनीचा नाव होत.

तिला सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. यावेळी तिच्यासह अशी घटना घडली आहे हे कळताच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संजना सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री तसेच वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

ही घटना कणकवलीतील शाळेच्या आवारात घडली आहे. यामुळे येथील गावकऱ्यांनी त्या मुलीला कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करा अशी मागणी केली. तेव्हा त्या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं. दुपारी दोनच्या सुमारास स्वरा ही शाळेत असताना खिडकीजवळ अभ्यास करत बसली होती.

याचवेळी मण्यार जातीच्या सापान खिडकीतून तिच्या हातावर सर्प दंश केला. इतर मुलंही घाबरली शिक्षकांनी स्वराच्या घरी फोन करून सांगितलं. तेव्हा तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी रुग्णालयात उपचार सुरू केले.

दैव बलवत्तर; प्रकृती स्थिर – यात ग्रामस्थांनी देखील खासगी रुग्णालयात स्वराला नेण्यात यावं अशी मागणी केली. तेव्हा सरपंच आणि इतर वरिष्ठ व्यक्तींनी तिला कणकवलीतील रुग्णालयात दाखल केलं. आता स्वरा बरी आहे. अशी काही डॉक्टर सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *