कुणी रक्ताने पत्र लिहिलं तर कुणी नॉनव्हेज सोडलं, बॉलीवूड कलाकारांनी आपलं प्रेम मिळवण्यासाठी केला आहे ‘या’ गोष्टींचा त्याग!

मुंबई | प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत असं म्हणतात. अशात प्रेम विवाह करत असताना या जोडप्यांना अनेक अडचणींना समोर जावे लागते. मग यासाठी कुणी जात बदलत तर कोणी खाण्या पिण्याच्या सवयी. प्रमात लोक कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्यासाठी एका पायावर तयार असतात. त्यासाठी ते कधीच मागे पुढे पाहत नाहीत. आपल्या जोडदाराबरोबर सुखी आयुष्य जगता यावं तसेच त्याला छान वाटावं म्हणून प्रियकर काहीही करतात. अनेक जोडपी तर पळून जाऊन देखील लग्न करतात.

अशात बॉलिवूडच्या प्रेम कहाण्या नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. चित्रपटात दाखवलेल्या अजब प्रेम कहाणी प्रमाणेच यांची देखील प्रेम कहाणी खूप रंजक असते. अनेक कलाकार हे १ किंवा २ वेळा नाही तर १० वेळा सुद्धा प्रेमात पडले आहेत. मात्र मग असे प्रेम चित्रपट संपला की, प्रेम ही संपलेले आहेत.

मनोरंनविश्वात अनेक कलाकारांनी आपल्या जीवनसाथीला मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्याग केला आहे. यामध्ये अगदी दीपिका पासून ते धर्मेंद्र यांच्या पर्यंत अनेक कलाकार शमिल आहेत. या बातमीतून प्रेमासाठी मोठे त्याग केलेले काही व्यक्ती पाहणार आहोत.

करीना कपूर – शादित कपूर
बॉलिवुडची बेबो दिसायला एवढी सुंदर आहे की, कोणताही अभिनेता तिच्या प्रेमात पडेल. अशात जब वी मेट या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहिद कपूर आणि बेबोच्या प्रेम कहानी ची जोरदार चर्चा रंगली होती. हे दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. अनेकदा यांना बऱ्याच ठिकाणी एकत्र स्पॉट देखील केले गेले होते. करीनाने शहीदसाठी मांसाहार सोडला होता. मात्र या दोघांची प्रेम कहानी फार काळ टिकली नाही. त्यानंतर पुढे करीन आणि सैफ अली खान बरोबर विवाह केला.

दीपिका पदुकोण – रणबीर कपूर
बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच रणबिर कपूर आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता. त्यातीलच एक बॉलीवूडची मस्तानी दीपिका पदुकोण. दीपिका रणवीर बरोबर कधीच टाईमपास करत नव्हती. ति नेहमीच त्याच्यावर जिवापाड आणि मनापासून प्रेम करत होती. मात्र इतर अभिनेत्री आणि प्रमाणे रणबीरने तिला देखील फसवले. रणबीरच्या प्रेमाखातर दीपिकाने तिच्या मानेवर रणबीरच्या नावाचा एक सुंदर असा टॅटू देखील गोंधला होता. मात्र या दोघांचे ब्रेकअप झाल्यावर दीपिकाने तो टॅटू काढून टाकला. तसेच नंतर तिने रणवीर सिंग बरोबर विवाह केला.

हेमा मालिनी – धर्मेंद्र
70 ते 80 च्या दशकात मोठ्या प्रमाणावर गाजलेलं हे कपल होतं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेम कहानी साता समुद्र पारदेखील पोहोचली होती. धर्मेंद्र यांची हेमामालिनी ही दुसरी पत्नी आहे. धर्मेंद्र विवाहित होते मात्र नंतर ते हेमामालिनी यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी घटस्फोट आधीच हेमामालिनी यांच्याशी गुपचूप विवाह केला होता. आपल्या प्रेमाखातर या दोघांनी देखील इस्लाम धर्माचा स्वीकार केला.

• अनुष्का शर्मा – विराट कोहली
क्रिकेट आणि बॉलीवूड या दोन्ही क्षेत्रांचा एकमेकांशी एक वेगळं जवळच नात आहे. अनेक क्रिकेटर्सने बॉलीवूडमधील अभिनेत्रींशी लग्न केलेल आहे. त्यातीलच एक विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. अनुष्काला प्राणी खूप आवडतात. ती शुद्ध शाकाहारी आहे. लग्न झाल्यानंतर विराटने अनुष्का शेट्टी त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. विराट हा नॉनव्हेज खूप खायचा. मात्र अनुष्कासाठी त्याने नॉनव्हेज खाणं सोडलेल आहे. आता तो देखील शाकाहारी झाला आहे.

किरण राव – आमिर खान
काही वर्षांपूर्वीच आमिर खान आणि किरण राव या दोघांचा घटस्फोट झाला आहे. मात्र या दोघांची प्रेम कहानी फारच अजब आहे. किरण राव ही आमिरची दुसरी पत्नी होती. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव रीना दत्त असे होते. रीनाला घटस्फोट दिल्यानंतर किरण बरोबर लग्न करण्यासाठी आमिर खूप वेडा झाला होता.

किरणला इम्प्रेस करण्यासाठी त्याने चक्क स्वतःच्या रक्ताने तिला पत्र लिहिलं होतं. तर या उद्या बॉलीवूडमधील काही जोड्या ज्यांनी आपल्या प्रेमात तर वेगवेगळ्या गोष्टींचे त्याग केलेले आहेत. यातील तुमची आवडती जोडी कोणती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *