काही लोक समजत होते याला हिरो, मात्र हा खऱ्या आयुष्यात निघाला विलन पेक्षाही मोठा खूनी…..

मुंबई | मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 28 चित्रपटांमध्ये अभिनय केलेला एक कलाकार आणि सध्याचा नराधम चोरी आणि खून करून बरेच दिवस फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी शासनाने 25 हजारांची रक्कम देखील जाहीर केली होती. हरियाणातील पोलिसांच्या एका विशेषता फोर्सने गाझियाबादमध्ये या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गुन्हेगार ओमप्रकाश उर्फ पाशा हा साल 2007 पासून अभिनय क्षेत्रात कार्यरत होता. त्याने एकूण 28 भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो पाणीपत या जिल्ह्यातील नारायणगावचा मूळ रहिवासी आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो गाझियाबादच्या हरबन्स नगर येथे राहत होता. त्याच्याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी सांगितले की, तो एक माझी सैनिक देखील आहे. त्याच्या सततच्या चुकांमुळे साल 1988 मध्ये त्याला सेनेतून बडतर्फ करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. तो गाझियाबादच्या हरबन्स येथे लपून बसला होता. अशात पोलिसांच्या पथकाला तो तिथे असल्याची टीप मिळाली. त्यामुळे लगेचच पोलिसांनी त्याला अटक केली. ओमप्रकाश उर्फ पाशा हा लष्करात कॉन्स्टेबल होता. साल 1984 मध्ये लष्कराच्या सिग्नल कॉर्प्समधून गैरहजर राहिल्यानंतर त्याने गुन्हेगारीच्या विश्वात प्रवेश केला.

1986 पासून त्याने आपल्या गुन्हेगारीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. लष्कराने त्याची सेवा 1988 मध्ये संपुष्टात आणली. यानंतर 15 जानेवारी 1992 रोजी पाशाने भिवानीच्या मुबारिकपूर येथील रहिवासी धरमसिंग याला लुटण्याच्या उद्देशाने तो त्याच्या घरी गेला. त्यावेळी त्यांची झटापट झाली. यावेळी पाशाने त्या व्यक्तीला चाकूने भोसकले आणि तिथून पळ काढला. या प्रकरणात त्याच्यावर सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एका निष्पाप व्यक्तीच्या खुनानंतर देखील तो शांत झाला नाही. त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या आणि लुटमार केली. आपल्या गावातून पळून आल्यानंतर त्याने गाझियाबाद मध्येच एका महिलेबरोबर लग्न केलं. तसेच त्याला आता तीन मुलं देखील आहेत. मात्र गुन्हेगारीचा अंत हा कधी ना कधी होतच असतो. एसटीएफच्या पथकाने माहिती मिळताच त्याला अटक केली आहे. त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या अनेक व्यक्तींनी त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *