बापरे! निसर्गाने दिलेल्या चेहऱ्याची लावली वाट, प्लास्टिक सर्जरीमुळे काही अभिनेत्र्या झाल्या सुंदर तर काहिंची झाली वाईट अवस्था

मुंबई | स्त्री म्हटलं की, सुंदरता आलीच आणि मग सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधने देखील आलीच. सर्व सामान्य घरात अनेक मुली सुंदर दिसण्यासाठी पावडर, लिपस्टिक आणि वेगवेगळे काही प्रोडक्ट वापरतात. तर हे झालं समण्यांनच पण श्रीमंत घरात आणि पडद्यावर दिसणाऱ्या सर्वच अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी स्वतः चा चेहराच बदलतात.

मोठ मोठ्या शस्त्रक्रिया करून सुंदर चेहऱ्याची वाट लावून घेतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी स्वतः चा चेहराच बदलला आहे. हा आता चेहरा बदलून काही जणी सुंदर दिसतायत पण काहींच्या चेहऱ्याची वाट लागली आहे. आज त्यातीलच काही अभिनेत्रींची माहिती जाणून घेऊ.

• राखी सावंत : परदेसीया या गाण्याने सर्वांना आपल्या तालावर नाचवणारी राखी त्या काळी खूप सुंदर दिसत होती. मात्र नंतर तिने स्वतःच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घेतली. या बाबत तिने स्वतः अनेकदा कबुली देखील दिली आहे. तिने ओठ, हनुवटी, गाल या सर्वांची प्लास्टिक सर्जरी केली आहे. आकर्षक दिसण्यासाठी केलेल्या या प्लास्टिक सर्जरीमुळे आता ती आकर्षक कमी आणि जाड जास्त दिसते.

• अनुष्का शेट्टी : बाहुबली चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात घर करणारी अनुष्का शेट्टी ही आधी खूप जाड होती. तिने सुरुवातीला वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि योगा केला मात्र यात जास्त वेळ जात आहे हे लक्षात आल्यावर तिने सर्जिरी करून शरीरातली अतिरिक्त चरबी कमी केली. अनुष्का या सर्जरी नंतर खूप सुंदर दिसते आहे.

• आयशा टाकिया : टारझन हा चित्रपट बऱ्याच जणांनी हमखास पाहिला असेल. आयशाचा हा पहिलाच चित्रपट होता. यामध्ये तिच्या स्माईलचे अनेक जण दिवाणे झाले होते. पण आणखीन सुंदर दिसण्याची हौस भारी. त्यामुळे तिने ओठांची सर्जरी केली. या सर्जरी नंतर काही दिवस तर ती खूप बेकार दिसत होती. कारण तिची स्माईल तिने स्वतः खराब करून घेतली होती.

• अनुष्का शर्मा : अनुष्काने देखील प्लास्टिक सर्जरी केली आहे. तिचा रब ने बना डी जोडी हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला समजेल की, त्यामुळे ती किती वेगळी दिसत होती आणि आता ती किती वेगळी दिसते आहे. अनुष्काने देखील ओठांची सर्जरी केली आहे. या सर्जरी नंतर काही दिवस काम नाही पण ट्रोलिंग मात्र तिला मिळालं.

• श्रुति हासन : कमल हसन यांची ही मुलगी. तिचा पहिला चित्रपट रमया वस्तावया या चित्रपटात ती कमालीची क्यूट आणि गोड दिसत होती. मात्र त्यानंतर तिने देखील प्लास्टिक सर्जरी करून स्वतःच्या चेहऱ्याची वाट लावून घेतली. तिने फक्त ओठ नाही, तर नाकाची देखील प्लास्टिक सर्जरी केली आहे. पण तिचं कौतुक करण्याची गिष्ट अशी की, ती स्टार कीड असून देखील तिने आपल्या करिअरमध्ये कधीच त्याचा उपयोग करून घेतला नाही. आता पर्यंत ती जे काही आहे ते सर्व नाव तिने स्वबळावर कमावलं आहे.

• करिश्मा कपूर : नव्वदच्या दशकात करिश्मा कपूरने बॉलिवूड खूप गाजवलं. गोविंदा बरोबरचे तिचे अनेक चित्रपट चाहते आजही आवर्जून पाहतात. तुम्हाला वाटत असले की करिश्मा तर दिसायला खूप सुंदर आहे आणि वाटत नाही की, तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे. तर तुमचं बरोबर आहे. कारण ती प्लास्टिक सर्जरी आधी एवढी खास दिसत नव्हती.

सर्जरी केल्यानंतर ती खूप सुंदर दिसू लागली आणि तिची ही सर्जरी तिला खूप सुट झाली. तर या होत्या बॉलिवूडमधल्या प्लास्टिक सर्जरी करून थोड्या चांगल्या आणि थोड्या वाईट दिसत असलेल्या अभिनेत्री. यापैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *