सिराज गेला पंचाच्या अंगावर धावून; नेमकं काय घडलं?

रांची | मोहम्मद सिराजचा विचार ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी विचार केला जात आहे. पण सिराजचं नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सिराजला आता कोणी ती आवरा, अशी चर्चाही चाहत्यांमध्ये आहे. कारण दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात सिराजकडून घडली मोठी चूक घडली होती. पण आपली चूक असूनही तो पंचांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा वनडे सामना रांची येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने सात गड्यांनी विजय मिळवत मालिका बरोबरीत आणली. गोलंदाजांनी अखेरच्या षटकात केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 278 पर्यंत रोखले होते. त्यानंतर श्रेयस अय्यर व इशान किशन यांनी अर्धशतक आणि शतकीय भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने या सामन्यात शानदार विजय मिळवला असला तरी, संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा एका वादात अडकला.

श्रेयश अय्यर आणि ईशान किशन यांची नाबाद खेळी – या सामन्या बद्दल बोलायचे झाल्यास दक्षिण आफ्रिकेने रीझा हेन्ड्रिक्स आणि ऐडन मार्करम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 279 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारतातर्फे ईशान किशनने 93 तर श्रेयस अय्यरने नाबाद 113 धावांची खेळी करत संघाला सात गड्यांनी विजय मिळवून दिला. मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना दिल्ली येथे 11 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.

काय घडल नेमकं – ४८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर. यावेळी सिराज गोलंदाज करत होता आणि केशव महाराज हा फलंदाजी करत होता. सिराजने यावेळी उत्तम चेंडू टाकला जो केशवला मारता आला नाही. त्यामुळे हा चेंडू थेट यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला. संजूने हा चेंडू थेट सिराजकडे फेकला. सिराज हा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी निघाला. पण त्याचवेळी त्याला नॉन स्ट्राइकला असलेला डेव्हिड मिलर हा क्रिझमध्ये नसल्याचे दिसले.

या गोष्टीचा फायदा उचलण्याचा त्याने विचार केला. सिराजने हा चेंडू स्टम्पवर मारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मिलर रनआऊट होऊ शकेल. पण त्यावेळी सिराजचा नेम चुकला आणि हा चेंडू स्टम्पला लागला नाही. सिराजने हा चेंडू एवढ्या जोरात मारला होता की, तो थेट सीमारेषेपार गेला आणि पंचांनी दक्षिण आफ्रिकेला चार धावा देण्याचे जाहीर केले. यावेळी सिराज पंचांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. सिराज यावेळी पंचांशी

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *