अभिनय क्षेत्रात शोककळा! आणखी एका प्रसिध्द पंजाबी गायकाचे निधन

दिल्ली | प्रसिद्ध पंजाबी गायक बलविंदर सफारी यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अनेक दिवसांपासून त्यांना हृदयाशी संबंधित काही आजार होते. त्यामुळे एप्रिल 2022 मध्ये ब्रिटनमधील वोल्व्हरहॅम्प्टन येथील न्यू क्रॉस हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले.

तिथे त्यांच्यावर ट्रिपल बायपास सर्जरीनंतर करण्यात आली. मात्र त्यामुळे ते कोमात गेले होते. रुग्णालयात 86 दिवस घालवल्यानंतर बलविंदर सफारी यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र काही दिवसांनी त्यांच्या त्याब्येतीत आणखीन बिघाड झाला. अशात आपल्या आजाराशी सुरू असलेली त्यांची झुंज 26 जुलै रोजी संपली आणि त्यांचे निधन झाले.

बलविंदर सफारी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देताना पंजाबी गायक गुरू रंधावा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आम्ही तुमचे संगीत आणि पंजाबी संगीतातील योगदानाची कायम कदर करू. गुडबाय सर बलविंदर सफारी.” असं त्याने लिहिलं आहे.

बलविंदर सफारी त्यांच्या गाण्यांसाठी खूप लोकप्रिय होते. ‘चन मेरे मखना’, ‘नचदिनू’, ‘पाव भांगडा’, ‘पर लिंगडे’, ‘गल सुन कुर्‍ये’ त्यांची ही गाणी खूप गाजली. त्यांच्या आवाजाचे लाखो चाहते होते. अशात एवढ्या प्रसिद्ध गायकाच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

पंजाबी अभिनेत्री नीरू बाजवा हिने ‘पर लिंगडे’ या गायिकेची आठवण काढली आणि लिहिले की, “मेनू याद है बलविंदर जी नू ऐसी विंडो तो देखा सी #beautifulbillo शूटिंग दरम्यान… आम्ही खूप उत्साहित होतो. तो मोठ्या कृपेने आम्हाला भेटायला आला. सर पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीला खूप काही दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही नेहमी आमच्या हृदयात जिवंत राहाल.” दिलजीत दोसांझने ट्विटरवरून दिवंगत गायकाला श्रद्धांजली वाहिली. त्याने सफारी यांचा एक फोटो शेअर केला आणि हात जोडलेल्या इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाहेगुरु”.

बलविंदर सफारी यांच्या निधनाने सिनेसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशात गेल्याच महिन्यात गायक सिद्धू सिंग मुसवालाची गोळ्या झाडून हत्या केली गेली. यावेळी देखील पंजाबी सिनेसृष्टीत शोक पसरला होता. आता त्याच्या मारेकऱ्यांना देखील शिक्षा झाली आहे. मात्र या दुःखातून सावरत नाही तोच बलविंदर सफारी यांनी देखील या जगाचा निरोप घेतला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *