सिद्धू मुसेवाला, केके नंतर आणखी एका दिग्गज गायकाचे निधन; देशावर शोककळा

मुंबई | ‘मौसम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘दूरियां’ आणि ‘हकीकत’ यांसारख्या चित्रपटांसाठी अनेक अविस्मरणीय गाणी गायलेले ज्येष्ठ गझल गायक भूपिंदर सिंग यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची पत्नी मिताली सिंग यांनी भूपिंदर सिंग यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. 10 दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांना कॅन्सर असल्याचं संशय होता. तसेच कोविडमुळे देखील त्यांना त्रास होत असल्याचं म्हटल जात आहे. उपचारादरम्यान, भूपिंदर सिंग यांना मोठ्या आतड्यात कर्करोग झाल्याची शक्यता दिसत होती. त्यांना कोविड देखील झाला, त्यानंतर त्यांची प्रकृती सतत खालावत होती. एकीकडे कॅन्सर वाढण्याची शक्यता स्कॅनिंगमध्ये स्पष्ट दिसत होती आणि दुसरीकडे त्यांचा कोरोना देखील बरा होत नव्हता. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी या जगात अखेरचा श्वास घेतला.

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूपिंदरचा मृत्यू अनेक विकारांच्या समस्येमुळे झाला आहे. गझल गायक भूपिंदर सिंग यांची कारकीर्द सर्वांना माहिती आहे. ‘होके मजबूर मुझे उसके बुला होगा’, ‘दिल धुंदता है’, ‘दुकी पे दुकी हो या सत्ता पे सत्ता’ सारखी त्यांची सर्व गाणी खूप लोकप्रिय झाली त्यामुळे त्यांचा जाता वर्ग देखील भला मोठा आहे. त्यांचा आवाज त्यांना चाहत्यांमध्ये नेहमीच अजरामर ठेवेल असं म्हणायला हरकत नाही.

लहानपणी भूपिंदर यांनी वडिलांकडून गिटार वाजवायला शिकले. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांनी संगीताचे सुरुवातीचे धडे त्यांच्या वडिलांकडून घरीच घेतले. पण जसजसे त्यांचे कौशल्य सुधारत गेले, तसतसे ते या क्षेत्रात गेले आणि नंतर दिल्लीला रवाना झाले. तेथे त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये गिटारवादक आणि गायक म्हणून काम केले होते.

संगीतकार मदन मोहन यांनी त्यांना १९६४ मध्ये पहिला मोठा ब्रेक दिला. भूपेंद्र सिंह यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४० रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. त्यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंग हे देखील उत्तम संगीतकार होते. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलजार यांनी लिहिलेल्या ‘वो जो शहर था’ या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळाली. भूपेंद्र यांनी १९८० मध्ये बंगाली गायिका मिताली मुखर्जीसोबत लग्न केले. मात्र, दोघांना मूलबाळ नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायक यांच्या निधनाबद्दल ट्विटर मार्फत शोक व्यक्त केला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *