सिध्दार्थ करणार दोन मुलांची आई असलेल्या या अभिनेत्री बरोबर लग्न; चाहाते ही चक्रावले

मुंबई| सध्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या एका वक्तव्याने चर्चेत आला आहे. यावेळी त्याने त्याच्या लव लाईफ बद्दल असा काही खुलासा केला आहे की, सर्वजण थक्क झाले आहेत. तसेच त्याच्या प्रेम कहाणी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता चात्यांच्या मनात आहे. तर आता जराही वेळ वाया न घालवता त्याने केलेल्या त्या वक्तव्याबद्दल जाणून घेऊ.

कदाचित त्याचं हे वक्तव्य ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल. सिद्धार्थ मल्होत्रा हा नेहमीच त्याच्या जॉली लूकमुळे अनेक मुलींचा क्रश आहे. मात्र त्याला जेव्हा लग्ना विषयी विचारले गेले. तेव्हा त्याच्या ओठावर दोन मुलांची आई असलेल्या एका अभिनेत्रीचे नाव आले. त्या अभिनेत्रीचे लग्न झाले असून तिचा पती देखील एक मोठा अभिनेता आहे. मात्र सिद्धार्थला तिच्या पतीला भाऊ बनवून त्या अभिनेत्री बरोबर लग्न करायचे आहे.

आता ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे माहीत करून घेऊ. बॉलीवूडच्या बेबोची अदा आणि तिचं सौंदर्य नेहमीच सर्वांना भुरळ घलंत असतं. त्यामुळे तिच्या प्रेमात सिद्धार्थ देखील वेडा झाला आहे. त्याला करीना खूप आवडते आणि तिच्याबरोबर लग्न करण्याची त्याची इच्छा आहे. त्याला करीना खूप आवडते.

कॉफी विथ करण या शोमध्ये तो एकदा गेला होता त्यावेळी त्याला करणने विचारले की, ” तुला कुणाबरोबर लग्न करायचे आहे.” त्यावेळी त्याने करीना कपूरचे नाव घेतले. त्यानंतर करणने त्याला विचारले की, ” तुला कुणाला भाऊ बनवायला आवडेल? त्यावेळी हसत हसत तो म्हणाला की, ” जर करीना माझी पत्नी होणार तर तिच्याच पतीला म्हणजेच सैफ अली खानला मला भाऊ बनवायचे आहे. ”

त्याच्या उत्तरावर त्यावेळी खूप हशा पसरला होता. अता त्याचे हे वक्तव्य कॉफी विथ करण याच्या मागील पर्वातील आहे. मात्र सध्या हे वक्तव्य खूप व्हायरल होतं आहे. तसेच सिद्धार्थच्या आणि करीनाच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे. सिद्धार्थने त्याच्या कारकिर्दीला साल २०१२ मध्ये स्टूडेंट ऑफ द इयर या चित्रपटातून सुरुवात केली होती. त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट आले. मात्र त्याने साकारलेली शाहिद कॅप्टन विक्रम बात्रा यांची भूमिका खूप गाजली.

कॉफी विथ करण हा शो नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा हा शो वादात देखील सापडतो. मात्र तसे असले तरी देखील या शोचे लाखो चाहते आहेत. आता या शोमध्ये लवकरच सिद्धार्थ पुन्हा एकदा येणार असल्याचे म्हटले जात आहे. तर आता यावेळी तो आपल्या लव लाईफ बद्दल कोणते खुलासे करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *