सिद्धार्थ जाधवची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी आणि आघाडीचा अभिनेता म्हणजे सिध्दार्थ जाधव. आपल्या विनोदी अभिनयाने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. त्याच्या अभिनयाने आज त्याने मराठी तसेच बॉलीवूडमध्ये देखील नाव कमवले आहे. अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी करून तो खूप मोठा स्टार झाला आहे. सिद्धू सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी शेअर करतो.

अशात आता त्याच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. सिध्दार्थची प्रकृती ठीक नसल्याने त्याला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील कलाकार मंडळी आजारी पडत आहेत. अनेकांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन देखील होतं आहे. त्यामूळे आता त्याचे चाहते खूप चिंतेत आहेत. सिध्दार्थने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

नुकतेच त्याचे दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. तमाशा लाईव्ह आणि दे धक्का या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याने दमदार अभिनय केला आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशात या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याने खूप मेहनत घेतली. तसेच नंतर तो या चित्रपटांच्या प्रमोशन साठी देखील खूप व्यस्त होता. या काळात त्याचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. त्यामूळे त्याची प्रकृती खालावली. अशात आता या दोन्ही चित्रपटांची सर्व कामे पूर्ण करून तो हिंदुजामध्ये ऍडमिट झाला. इथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

सिद्धूने या हॉस्पिटल मधील एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने हाताला हॉस्पिटलचा बँड लावला आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ” नमस्कार ….. गेला आठवडाभर मी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल होतो..आज घरी आलो… मनापासून आभार हिंदुजा हॉस्पिटलच्या स्टाफ चं..खुप मनापासुन काळजी घेतली माझी… अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टिम… एका फोनवर नेहमीच धावून येणारे दादा ….शशांक नागवेकर दादा. आणि परिवार तुमचा _support खुप महत्त्वाचा होता….. आणि माझा मोठा भाऊ डॉ. लवेश जाधव जो रात्रभर जागून माझी काळजी घेत होता.”

पुढे त्याने आपल्या प्रकृती विषयी लिहिले आहे की, ” मी बरा व्हाव्हा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं.. त्यांना मनापासून धन्यवाद… आता हळूहळू बरा होतोय… खुप धावपळ असते आपली… पण त्यातही स्वतःच्या हेल्थ कडे दुर्लक्ष होणार नाही याची कृपया काळजी घ्या…” त्याची ही पोस्ट आता सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. अनेक चाहते त्याला तब्येतीची काळजी घे असे सांगत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *