धक्कादायक! बॉलिवूडचा हा प्रसिद्ध अभिनेता देत आहे एका गंभीर आजाराशी झुंज….

दिल्ली | ‘जब ढाई किलो का हाथ किसी पर पड जाता है, तो आदमी उठ नही दुनिया से उठ जाता है’ या एका डायलॉगने आपल्या भारदस्त बॉडी आणि अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सनी देवल. मात्र सध्या च्याची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे सनी देओल अमेरिकेत राहून उपचार घेत आहे. सनी देओलच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, काही आठवड्यांपूर्वी त्याच्या आगामी एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान त्याच्या पाठीला दुखापत झाली होती.

आता सनी 65 वर्षांचा झाला आहे. सनीवर मुंबईत आठवडाभर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी तो अमेरिकेला गेला. पंजाबमधील गुरुदासपूरमधून लोकसभा खासदार असलेल्या सनी दुखापतीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीला उपस्थित राहू शकला नाही.

दिग्दर्शक आर बाल्की यांच्या ‘चूप’ या चित्रपटात पूजा भट्ट आणि दुल्कर सलमानसोबत सनी लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय तो ‘गदर 2’ आणि ‘अपने 2’ मध्येही दिसणार आहे. मल्याळम क्राईम थ्रिलर ‘जोसेफ’चा हिंदी रिमेक असलेल्या ‘सुर्या’ मध्ये देखील तो दिसणार आहे. एप्रिलमध्ये सनीने या चित्रपटातील त्याचा पहिला लूक सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला होता.

सनी देओलने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा पहिला चित्रपट बेताब हा 1983 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2016 मध्ये त्याचा ‘ घायल वन्स अगेन ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन स्वतः सनी देओलने केले आहे . या चित्रपटाचा सिक्वेल ‘घायल’ हा 1990 मध्ये बनला होता.

सनी देओलचे बॉर्डर आणि गदर सारखे चित्रपट खूप हिट झाले आहेत. सनी देओल डायलॉग डिलिव्हरीसाठीही ओळखला जातो. त्याचा धाई किलो का हात हा डायलॉग आजही खूप फेमस आहे. मात्र आता त्याच्या पाठीच्या दुखण्याने तो त्रस्त आहे. त्यामुळे अनेक चाहते तो लवकर ठीक व्हावा अशी प्रार्थना करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *