धक्कादायक! सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेत्याचा झाला मृत्यू….!

मुंबई| मालिका विश्वातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रसिद्ध मालिकेतील एका कलकराचा मृत्यू झाला आहे. अभिनेते अरविंद धनू यांचे सोमवारी दुःखद निधन झाले. रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे जाई पर्यंत त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. यामध्ये जागीच त्यांचे निधन झाले.

‘लेक माझी लाडकी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘क्राईम पेट्रोल’ अशा काही मालिकांबरोबरच त्यांनी ‘एक होता वाल्या’ या मराठी चित्रपटात देखील काम केले होते. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देखील त्यांनी दमदार अभिनय केला होता. त्यामुळे या मालिकेतील अनेक कलाकार देखील त्यांना सोशल मीडियामार्फत श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात अनेक मोठ्या कलाकारांचे मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज आणि मोठ्या कलाकारांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. अशात आता या मध्ये अभिनेते अरविंद धनू यांचा देखील समावेश झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *