धक्कादायक! एसटी चालकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण पाहून धक्काच बसेल 

धुळे | नोव्हेंबर महिन्यात एस्टी कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. यावेळी एस्टी कर्मचाऱ्यांचा वाद चांगलाच पेटला होता. अशात आता एका एस्टी चालकाने आत्महत्या केली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे.

विशेष म्हणजे या एस्टी चालकाने एसटीमध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. धुळे येथील बसस्थानकात ही हृदय हेलावणारी घटना घडली आहे. हिरामण देवरे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

त्यांनी आपली जीवन यात्रा बसमध्ये घंटी वाजवन्यासाठी असलेल्या दोरीने संपवली आहे. याच दोरीने त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला आहे. पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानक येथे हिरामण देवरे बस चालक म्हणून कार्यरत होते. बस घेऊन ते धुळ्याकडे रवाना झाले. जेव्हा बस धुळ्यातील बस स्थानकात आली तेव्हा त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

बसस्थानकात बस आल्यावर सर्व प्रवासी खाली उतरले. त्यानंतर बस बराच वेळ तिथे उभी होती. बसचालक बाहेर येत नाही. बराच वेळ हिरामण यांची वाट पाहिली. मात्र ते खाली आले नाही. त्यामुळे काही व्यक्तींनी बसमध्ये डोकावून पाहिले. त्यावेळी बसमधील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

हिरामण यांनी त्याच बसमध्ये गळफास घेतला होता. त्यांना पाहून इतर सर्व एस्टी कर्मचाऱ्यांनी बसच्या दिशेने धाव घेतली. सदर घटनेत त्वरित पोलिसांना बोलावले गेले. पोलिसांनी हिरामण देवरे यांचे शव ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पुढे पाठवले.

या घटनेने सर्वच एस्टी कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. हिरामण देवरे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याची अद्याप ठोस माहिती समजलेली नाही. मात्र ही घटना धुळे बसस्थानकात घडल्याने संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

एस्टी कर्मचाऱ्यांनी विलनीकरणासाठी खूप आंदोलने केली. मात्र अजूनही त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. यावेळी त्यांच्या शासनाकडे बऱ्याच मागण्या होत्या. या सर्व मागण्या पूर्ण न झाल्याने देवरे चींतेत्त होते त्यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले का? असा प्रश्न सर्व सामान्य नागरीकांना पडला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *