धक्कादायक! दाक्षिणात्य अभिनेत्री लठ्ठपणा कमी करण्याच्या नादात गमावून बसली जीव, शेवटची अवस्था पाहून व्हाल थक्क…

बॉलीवूड आणि टॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री आरती अग्रवालला आज कोण ओळखत नाही अशी एकही व्यक्ती नाही या अभिनेत्रीने तेलगू सिनेसृष्टीला अतिशय जबरदस्त चित्रपट दिले आहेत. परंतु कालांतराने अभिनेत्रींच्या सुंदरतेचा नजरच लागली. अभिनेत्रीचा लठ्ठपणा वाढत गेला आणि तिचे सौंदर्य धळत गेले.

 

अभिनेत्री आरती अग्रवालने स्वतःचा लठ्ठपण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. योगासने, जिम मध्ये व्यायाम, गोळ्या, औषधे, अनेक प्रकारच्या सर्जन ट्रीटमेंट घेतल्या. परंतु आरतीचा लठ्ठपणा काही कमी झाला नाही. अखेर आरतीने लठ्ठपणा कमी करण्याच्या  नादात स्वतःचा जीव गमावला परंतु आरतीचा लठ्ठपणा काही कमी झाला नाही.

आपला लठ्ठपणा घावण्यासाठी एका सेलिब्रिटीने  तर चक्क सर्जरी देखील केली आहे.  लठ्ठपणा कमी करण्यासाठी करण्यात येणारी लिपोसक्शन शस्त्रक्रिया अयशस्वी होऊन बसल्याने, हृदयविकाराच्या झटक्याने तेलगू अभिनेत्री आरती अग्रवालचे अमेरिकेत

३१ वर्षाच्या या अभिनेत्रीने तेलगू, तामिळ व हिंदी अशा २५ चित्रपटांत काम केले होते. राणम २ हा तिचा तेलगू चित्रपट तेलंगणा व आंध्र प्रदेशात शुक्रवारी प्रसिद्ध झाला असून, शनिवारी तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार आरती स्थूलत्व व इतर विकाराने ग्रस्त होती.

न्यूजर्सी येथील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू होते. तिला दम्याचा विकार होता व तिच्यावर झालेल्या लिपोसक्शन शस्त्रक्रियेमुळे हा हृदयविकाराचा झटका आला. आरती अग्रवालला गेल्या काही वर्षापासून दम्याचा त्रास होत होता. महिन्यापूर्वी तिच्यावर लिपोसक्शन शस्त्रक्रिया झाली.
त्यानंतर तिला श्वसनाचा त्रास होऊ लागला. आरतीवर न्यू जर्सीतील अटलांटिक सिटीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथे तिच्यावर अजून एक शस्त्रक्रिया होणार होती, मात्र अचानक तिचे निधन झाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *