अदनान सामीच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी

दिल्ली | सोशल मीडिया हे एक असे माध्यम झाले आहे ज्या शिवाय कोणीच राहू शकत नाही. तरुणाईला तर या सोशल मीडियाने मोठी भुरळ घातली आहे. अशात संगीत विश्वातील एका कलाकाराने सोशल मीडिया संबंधी एक धक्कादायक सूचना दिली आहे.

संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक अदनान सामी याने नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर मोठा बदल केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलिट केल्या आहेत. आखं इंस्टाग्राम अकाउंट त्याने रिकाम केलं आहे. त्याच्या या वागण्याचा लोक वेगवेगळा अर्थ लावत आहेत.

अदनान सामीने सर्व पोस्ट डिलिट करून फक्त एक पोस्ट शिल्लक ठेवली आहे. या पोस्टमध्ये त्याने “अलविदा” असं लिहिलं आहे. त्याच असं अलविदा केलेलं पाहून चाहते अस्वस्थ झाले आहेत. कारण त्याने अद्याप यावर कोणतही स्पष्टीकरण दिलं नाही.

त्यामुळे अनेक चर्चांना आयत कुलित मिळालं आहे. त्याला कोणता त्रास होत आहे का? त्याला कशाची भीती आहे आहे का? तो आयुष्यात कोणता मोठा निर्णय तर घेत नाही ना? असे अनेक प्रश्न चाहत्यांना सतावत आहेत. अशात एकाने म्हटलं आहे की, त्याच लवकरच नवीन गाणं येत आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने हा पब्लिसिटी स्टंट केला आहे. अशात आता काय खरं काय खोटं हे फक्त अदनानच सांगू शकतो.

“भीगा हुआ मौसम प्यारा”, “तू सिरफ मेरा मेहबूब”, “दिल ने पुकारा”, “ख्वाजा मेरे ख्वाजा” अशी अनेक हिट गाणी त्याने गायली आहेत. त्याला अनेक पुरस्काांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. अशात तो सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. तो रोज काही ना काही पोस्ट शेअर करायचा. अचानक त्याच रिकाम इंस्टाग्राम अकाउंट पाहून चाहते हैराण आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *