धक्कादायक! पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

दिल्ली | आपले आणि भारतातील सर्व नागरिकांचे रक्षण करणारे व्यक्ती म्हणजे पोलीस. पोलिस नेहमीच आपल्या जीवाची बाजी लावून अनेक घटनेचा सोक्ष मोक्ष लावतात. वेळ पडली तर गुन्हेगारांवर बंदुकीच्या फैरी देखील करतात. मात्र एका मुख्य पोलीस अधिकाऱ्याने हीच बंदूक स्वतः वर चालवून आपले जीवन संपवले आहे.

ही घटना जम्मू येथील डोडा जिल्ह्यात घडली आहे. न्यायालयाच्या आगारात एका पोलिसाने स्वतःच्याच सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडली आहे. यात सदर व्यक्ती जागीच कोसळून मृत्यू मुखी पडले. सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

विशेष पोलिस अधिकारी गुमरेश सिंह वय वर्ष ४६ यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. ते गांडोह येथील मूळ रहिवासी होते. डोडा येथील सत्र न्यायालयात त्यांची ड्युटी होती. नेहमी प्रमाणे ते कामावर आले आणि आपली बंदूक घेऊन तैनात झाले. यावेळी एका कर्मचाऱ्याला गोळी चालल्याचा आवाज आला. लगेच त्याचे लक्ष गुमरेश यांच्याकडे गेले. त्यांनी पाहिले की, गुमरेश यांच्या छातीवर गोळी लागली आहे. तसेच ते रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत.

यावेळी तिथे इतर व्यक्ती देखील धावत आल्या. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र गोळी हृदयावर लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. सध्या तरी या विषयी पोलीस अधिक तपास करत आहे. असे म्हटले जात आहे की, त्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र पोलीस या बाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेनं त्यांचे इतर सहकारी आणि न्यायालयातील परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *