शुटींग दरम्यान शिल्पा शेट्टीचा गंभीर अपघात; डॉक्टर म्हणाले

मुंबई | आपल्या अभिनयाबरोबरच फिटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी एका अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टच्या दरम्यान ॲक्शन सीन शूट करत असताना तिच्या पायाला दुखापत झाली आहे. यात अभिनेत्रीच्या पायाचे हाड मोडले असल्याचे समजले आहे. यामुळे तिचे चाहते खूप चिंतेत आहेत. तसेच ती लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना करत आहेत.

शिल्पा शेट्टी ही रोहित शेट्टीच्या ” इंडियन पुलिस फोर्स” या सिरीजमध्ये झळकणार आहे. याच्याच ॲक्शन सीनच्या शुटींग दरम्यान हा अपघात घडला. यात तिच्या पायाचे हाड मोडले असून तिने डॉक्टरांकडे उपचार घेतला आहे. डॉक्टरांनी तिला सहा आठवड्यांसाठी विश्रांती घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे तिला आता शूटिंगला देखील जाता येणार नाही.

शिल्पाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत या विषयी माहिती दिली आहे. फोटोमध्ये तिच्या पायाला फॅक्चर झाल्यावर जशी पट्टी बांधली जाते तशी पट्टी बांधली आहे. तसेच एव्हढी दुखापत झाली असली तरी तिच्या गालावर हसू कायम आहे. शिल्पा नेहमीच तिच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींवर हिमतीने मात करत असते. याचीच प्रचिती पुन्हा एकदा तिच्या या फोटोमध्ये आली आहे. कारण यात ती विलचेअरवर बसलेली आहे.

विलचेअरवर असली तरी तिने चीज करत स्माईल दिली आहे. त्यामुळे तिच्या हिंतीची नक्कीच दाद द्यायला हवी. तिने हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ” रोल कॅमेरा ॲक्शन आणि बघा माझा पायच तुटला. आता सहा आठवड्यांसाठी मला कोणतीच हालचाल नाही करता येणार. पण मी आणखीन सक्षम होऊन परत उभी राहील. मी परत येई पर्यंत मला स्मरणात ठेवा आणि तुमचे आशीर्वाद कायम रहुद्या…. तुमची शिल्पा शेट्टी कुंद्रा”

अभिनेत्रीला दुखापत झालेली पाहून अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकार तिला कमेंट करत लवकर बरी हो असे म्हणत आहेत. यावर तिचीच बहीण शमिता शेट्टीने लिहिले आहे की, ” माझी मुनकी खूप धीट आहे ती लवकरच वरी होईल” तर बादशहा या गायकाने, ” अरे यार ” असं म्हटलं आहे. तसेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने, ” तू लवकर ठीक हो” अशी कमेंट केली आहे. यासह तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी हार्ट आणि गुलाबाचे ईमोजी पाठवले आहेत. तसेच सर्वांनी ती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

शिल्पाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती रोहित शेट्टीच्या फिमेल कॉप फिल्म्स अंतर्गत “इंडियन पुलिस फोर्स” मध्ये आपल्याला दिसणार आहे. यामध्ये तिच्या बरोबर सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय हे कलाकार प्रमुख भूमिका बजावताना दिसतील. हा एक फिक्शन चित्रपट असून अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. यामध्ये शिल्पा पहिल्यांदाच एका पोलिस अधिकारी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *