शेअर मार्केटचे बिग बूल राकेश झुनझुनवाला सोडुन गेलेत एवढी प्रॉपर्टी

मुंबई | शेअर मार्केटचा बिग बूल आपल्यापासून दूर गेल्याने सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले होते. राकेश यांनी आजवर शेअर मार्केटमध्ये स्वतःचे पाय घट्ट रोवले होते. त्यांच्या एका जादूने करोडपतीचा आलेख ढासळत होता.

आपल्या चाणाक्ष बुध्दीने त्यांनी शेअर मार्केट मधील अनेक आकडे फिरवले. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात १४ ऑगस्ट रोजी पहाटे राकेश झुनझूनवाला यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांना किडनीचे आजार होते. यावर उपचार घेऊन ते ठीक झाले होते. आठ दिवांपूर्वीच त्यांना घरी पाठवले होते. मात्र १३ ऑगस्टला रात्री पुन्हा त्यांना त्रास सुरू झाला त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र १४ ऑगस्ट रोजी त्यांची प्राण ज्योत मालवली.

राकेश झुनझुनवाला यांना वॉरेन बफे म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या यशा नंतर नुकतीच एअरलाइन क्षेत्रात झेप घेतली होती. अकासा एअर कंपनीची स्थापना करत यामध्ये त्यांनी मोठी गुंतवणूक केली. सात ऑगस्टपासून या कंपनीचे काम देखील सुरू झाले आहे. झुनझुनवाला हे आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. शेअर मार्केट मधील त्यांच्या अफाट ज्ञानामुळे अनेक व्यक्ती त्यांना फॉलो करायच्या. या श्रीमंत अवलियाच्या संपत्ती विषयी जाणून घेऊ.

शेअर बाजारात मोठी खेळी करणाऱ्या राकेश यांच्या नावावरती कोट्यावधींची प्रॉपर्टी आहे. त्यांनी शेअर मार्केटच्या दुनियेमध्ये बक्कळ संपत्ती कमवून ठेवली. एका माध्यमावर आलेल्या रिपोर्टनुसार तब्बल ४० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे ते मालिक होते.

एअरलाइन्स कंपनीचे काम सुरू झाल्यानंतर 26 जुलै पर्यंत त्यांच्याकडे 27 हजार 300 कोटी रुपयांचे शेअर होते. त्यानंतर 30 जुलै रोजी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने अनेक कंपन्यांमध्ये टायअप केले. तर 20 – 21 च्या आलेखावर लक्ष घातल्यास त्यांची संपत्ती 35 कोटी पर्यंत होती.

शेअर बाजाराचा बिगबुल असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात फक्त पाच हजार रुपयांनी केली होती. त्यांनी ज्यावेळी गुंतवणूक केली त्यावेळी लोक शेअर बाजाराला एक जुगार समजत होते. तसेच त्यावेळी कंपन्या जास्त नसल्याने गुंतवणूक करण्यासाठी कमी मार्ग उपलब्ध होते.

त्यामुळे अनेक व्यक्ती गुंतवणुकीसाठी बँकेकडे धाव घेत असायचे. मात्र याचवेळी मोठी रिस्क घेत राकेश झुनझुनवाला यांनी यात उडी घेतली. 1985 साली सेन्सेक्स 150 अंकाच्या जवळ होता. त्यावेळी दलाल स्ट्रीममध्ये त्यांनी पहिले पाऊल ठेवले. पुढे याच ५० हजारांनी त्यांनी कोट्यावधींची संपत्ती निर्माण केली.

शेअर मार्केटच्या दुनियेमध्ये अगदी सामान्य माणसं सुद्धा राकेश झुनझुनवाला यांना फॉलो करत होते. एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान मार्केट चांगलेच कोसळलं होतं. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्तींचा बराचसा तोटा झाला. मात्र राकेश झुनझुनवाला यांच्यावरती याचा तीळ मात्र परिणाम झाला नाही.

आकड्यांची मोड त्यांना अगदी पक्की माहीत होती. त्यामुळेच शेअर मार्केट इकडचं तिकडं झालं तरी देखील त्यांचा एकही पत्ता चुकीचा पडत नव्हता. अनेक जण शेअर मार्केट शिकत असताना राकेश झुनझुनवाला यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होते.

त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते शेअर मार्केट विषयी नेहमी मार्गदर्शन करायचे. ते म्हणायचे की, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराचे ध्येय आणि उद्दिष्ट फार वेगळे असते. यामध्ये असलेली रिस्क ही फार मोठी आहे. मात्र नीट विचार करून योग्य ठिकाणी फास टाकल्यास विजय नक्कीच होतो. असे ते म्हणायचे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *