शलाकाचा नवरा दिसतो खुपचं देखणा; करतोय हे काम

मुंबई | मन उडू उडू झालं या मालिकेने अल्पावधीतच मोठा प्रेक्षक वर्ग गोळा केला. प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करून ही मालिका आता संपणार आहे. मालिकेतील सर्वच पात्र खूप छान आहेत. अशात यातील देशपांडे गुरुजींच्या तिन्ही मुली खूप सुरेख आहेत. आज त्यांच्या मोठ्या मुलीविषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

देशपांडे गुरुजींची मोठी मुलगी म्हणजे शलाका. शलाका ही अतिशय भोळी आणि भित्री दाखवली आहे. मात्र अस असलं तरी ती तितकीच समजूतदार देखील दाखवली आहे. त्यामुळे या पात्राला देखील प्रेक्षकांनी खूप प्रेम दील आहे. मालिकेत हे पात्र अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी साकारत आहे.

अभिनय क्षेत्रात शर्वरी ही नवीनच आहे. ती संपदा जोगळेकर कुलकर्णी या प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्रीची लेक आहे. शर्वरीने भैरव बोरकर बरोबर लग्न केलं आहे. अशात लग्न नंतरची तिची मन उडू उडू झालं ही पहिलीच मालिका आहे. तिचा पती खूप हँडसम दिसतो. मात्र तो सोशल मीडियावर सक्रिय नसतो. शर्वरी ही सोशल मीडियावर नेहमी ॲक्टीव असते. अशात ती नेहमी तिच्या पती बरोबरच अनेक सुंदर फोटो शेअर करते. या दोघांची जोडी एकत्र खूप छान दिसते.

शर्वरी कुलकर्णीचा जन्म २७ जुलै रोजी ठाणे येथे झाला. ठाणे महाराष्ट्रात जन्मलेली, अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीने तिचे शालेय शिक्षण सरस्वती माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले आहे आणि डीजी रुपारेल कॉलेज कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. अभिनेत्री शर्वरी कुलकर्णीने पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातून अभिनयाचे धडे घेतले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *