सिध्दार्थ नंतर या व्यक्तीच्या प्रेमात पडलीय शहनाज? करतेय डेट

मुंबई | पंजाब चित्रपट सृष्टीतील कॅटरिना कैफ म्हणजेच अभिनेत्री शहनाज गील. बिग बॉस १३ नंतर हे नाव पुन्हा एकदा सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर प्रचंड गाजलं. बिग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त शोच्या १३ व्या सीजनमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शेहणाज गिल यांच्या नात्याची प्रचंड चर्चा होती.

शहनाज या घरातून लवकरच बाहेर पडली होती. मात्र सिद्धार्थने या शो मध्ये जेतेपद पटकावले होते. बिग बॉसची ट्रॉफी घेऊन बाहेर आल्यावर देखील शेहनाज आणि त्याच्या प्रेमाची चर्चा रंगली होती.

मात्र सिद्धार्थच्या अकालिन मृत्यू नंतर शहनाज पूर्णतः तुटून गेली होती. माध्यमांवर आणि सोशल मीडियावर सर्व जण तिच्यासाठी काळजी व्यक्त करत होते. कारण ती सिद्धार्थवर जीवापाड प्रेम करत होती. शहनाज ही नेहमीच अल्लड स्वभावाची दिसली आहे.

ती नेहमी तिच्या मनात जे येईल ते करत असते. ज्यावेळी ती आणि सिद्धार्थ बिग बॉसच्या घरात होते त्यावेळी तिचे खूप वेळा त्याच्याबरोबर भांडण झाले होते. तिला जसे हवे आहे तसेच सिद्धार्थने वागावे असे तिला वाटायचे. सिद्धार्थ देखील तिचे सर्व हट्ट पुर्ण करण्याचा प्रयत्न करायचा.

त्यामुळे बिग बॉसच्या घरातूनच हे दोघे चाहत्यांचे फेवरेट कपल झाले होते. सिद्धार्थच्या निधनानंतर ती खूप दुःखात होती. तिला खूप मोठा धक्का बसला होता. मात्र आता ती सत्य स्वीकारून पुन्हा एकदा नवीन दिशेकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शहनाजचं नाव सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. अशी चर्चा सुरू आहे की, ती आता पुन्हा एकदा तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे. तिच्या आयुष्यात एक नवीन तरुण आला आहे. तिच्या मनात त्याच्या विषयी सॉफ्ट कॉर्नर देखील तयार झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि अभिनेता राघव जुयाल याचे नाव शहनाज बरोबर जोडले जात आहे. अशी चर्चा आहे की, या दोघांमध्ये काही तरी सुरू आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत. तसेच ते एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शहनाज तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करत असलेलं पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. अनेक जण तिच्या नवीन आयुष्याला शुभेच्छा देत आहेत.

सलमान खानच्या कभी ईद कभी दिवाली या चित्रपटात हे दोघे एकत्र काम करत आहेत. शुटींग दरम्यान हे दिघे एकत्र आल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच हे दोघे हृषिकेशला देखील एकत्र गेले होते. तसेच त्यांनी एकत्र एक ट्रीप देखील काढली होती.

यावेळी त्यांनी तिथे काढलेले फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. दोघांनी एकाच ठिकाणी भेट देऊन फोटो काढले आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्याला आणखीन जोर आला आहे. सोशल मीडियावर या दोघांची खूप चर्चा रंगली आहे. मात्र अजूनही या दोघांपैकी कुणीही यावर शिक्कमोर्तब केलेला नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *