शाहिद कपूरची छोटी बहिण दिसते खूपच सुंदर, करते हे काम

मुंबई | शाहिद कपूरने आजवर बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या क्युटनेसने त्याने लाखोंचा चाहता वर्ग गोळा केला आहे. जब वी मेट या चित्रपटातून करीना कपूर बरोबर असलेली त्याची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. विवाह या चित्रपटामध्ये देखील त्याचा अभिनय खूप गाजला होता. सुरुवातीला अगदी क्युट आणि प्रेमळ भूमिका करणारा शाहिद कबीर सिंग मध्ये वेगळा अवतारात दिसला. यामध्ये त्याच्यातला रागीटपणा उफाळून आला.

कबीर सिंग या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. या सर्व चित्रपटांबरोबरच त्याने बॉलीवूडमध्ये पद्मावत, शानदार, किस्मत कनेक्शन, तेरी मेरी यारी, दिल बोले हडिप्पा, जर्सी, चुपचुपके, हाईडर अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. त्याच्या क्युट स्माईलमुळे तो नेहमीच प्रसिध्दी झोतात राहिला आहे. अशात शाहिद कपूरची बहिण देखील खूप सुंदर दिसते. शाहीदची बहिण देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या बातमीमधून तिच्या सुंदरतेवर एक नजर टाकूया.

शाहिद कपूरच्या बहिणीचे नाव सना आहे. सना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या ट्रेडिशनल आणि ग्लॅमर लूकने ती चाहत्यांना घायाळ करते. सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो खूप व्हायरल होतं आहेत. यावर अनेक जण वेगवेगळ्या कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. यातील एका फोटोत तिने ट्रेडिशनल ड्रेस परिधान केला आहे. यातील तिची पोज पाहून अनेक जण तिच्या प्रेमात पडले आहेत.

तिने शेअर केलेल्या दुसऱ्या एका फोटोमध्ये ती अतिशय गोड दिसत आहे. हा फोटो तिने सेल्फी घेत काढला आहे. यात तिच्या गालावरची खळी अगदी स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे एका युजरने तिला कमेंट करत म्हटलं आहे की, ” हुबेहूब आलिया दिसते. ”

 

 

सना देखील एक अभिनेत्री आहे. शाहिद कपूरच्या शानदार या चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली होती. हा तिचा देब्यू चित्रपट होता. पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची ती मुलगी आहे. तिने मंयक पहावा याच्याशी विवाह केले आहे. पहिल्या चित्रपटात दिसल्या नंतर ती बॉलीवूडमध्ये फारशी झळकली नाही. मात्र आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *