शाहरुख खान अडचणीत येण्याची शक्यता; हे प्रकरण तापणार?

दिल्ली | बॉलिवूड किंग खान मोठ्या ब्रेक नंतर आता पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या मुळे तो खूप चिंतेत आहे. त्याचा पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर येण्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक जण त्याच्या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. यात शाहरुख खानसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मोठ्या कमबॅक नंतर जर अशा पद्धतीने चित्रपटाला प्रदर्शित होण्या आधी जर नकार येत असेल तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडू शकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पठाण चित्रपटाची संपूर्ण टीम चिंतेत आहे.

नुकताच आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात आफटला. या चित्रपटाला # बॉयकॉट केले गेले. तसेच अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटाला देखील # बॉयकॉट करण्यात आले.

त्यामुळे दोन्ही चित्रपट यशस्वी ठरवले नाही. आता शाहरुख खानच्या चित्रपटावर देखील अशीच टीका सुरू राहिली तर हा चित्रपट देखील अडचणीत येऊ शकतो. शाहरुख साठी हे मोठे नुकसान असू शकते.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचा विरोध का केला जात आहे याचा शोध घेतल्यास समजते की, ” या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील आहे. तिच्या जेएनयू भेटीमुळे या चित्रपटावर # बॉयकॉट चालवला जात आहे.

साला २०२० मध्ये नागरिकत्व कायद्याला अनेकांनी विरोध केला होता. त्यावेळी जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामिया या महाविद्यालयात खूप निदर्शने केली गेली. यावेळी या आंदोलनाला मोठे हिंसक वळण लागले होते.

विद्यार्थ्यांच्या समर्थनात अभिनेत्री दीपिका पदुकोण जेएनयू कॉलेजमध्ये पोहचली होती. इथे गेल्यावर ती फक्त थोडावेळ उभी राहिली आणि तिथून निघून आली. मात्र आता या घटनेचा संबंध पठाण चित्रपटाशी जोडला जात आहे. यामुळे शाहरुख खानच्या चिंतेत देखील वाढ होते आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *