संतोष जुवेकरने शेअर केले शर्टलेस फोटो, चाहते म्हणतायेत ‘तू अगदी सुपर हॉट…’

मुंबई | बॉलीवूडमधील सर्वच अभिनेते हे सिक्स पॅक असलेले दिसतात. आपलं वय अधिक दिसू नये त्यामुळे प्रत्येक कलाकार स्वतःला मेंटेन ठेवतो. आता हेच प्रेस मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांमध्ये देखील दिसत आहे. नव्वदच्या दशकांमध्ये पाहिलं तर नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अशोक सराफ यांसारखी मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी फिटनेसकडे फारसे लक्ष देत नव्हती. मात्र सध्याची कलाकारांची पिढी ही फिटनेस कडे सर्वाधिक लक्ष देत असलेली पाहायला मिळते.

त्यातीलच एक अभिनेता संतोष जुवेकर. ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’  यासारख्या चित्रपटांतून नावारूपाला आलेला अभिनेता संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. संतोषची बॉडी पाहून अनेक तरुणी त्याच्यावर फिदा झाल्या आहेत. त्याने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो आरशासमोर उभा राहून स्वतःची बॉडी दाखवत आहे.

पिळदार शरीरयष्टी असलेल्या त्याचा हा फोटो पाहून चहा त्यांनी त्याच्या या फोटोवर लाईक आणि हार्ड इमोजीचा वर्षाव केला आहे. संतोषने आजवर चित्रपट मालिका तसेच वेब सिरीज आणि नाटक या माध्यमांमधून आपल्या अभिनयाची छाप संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवली आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना नेहमीच पाहायला मिळते. संतोष सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी तो चाहत्यांबरोबर शेअर करतो. तसेच सोशल मीडियावर तो त्यांच्याशी संवाद देखील साधतो.

या आधी देखील संतोषने एकदा शर्टलेस फोटो शेअर केला होता. त्यावेळी देखील तो मोठ्या चर्चेत आला होता. आता देखील त्याने शेअर केलेला हा फोटो खूप चर्चेत आला आहे. तसेच हा फोटो शेअर करत संतोषने या फोटोला एक लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे की, ” “सावधान काम चालू आहे. आता पुढे अजिबात गती रोधक नाही. जा सुसाट…असं बाप्पा म्हणाला मला.”

प्रत्येक कलाकारांना आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी स्वतःमध्ये वेगवेगळे बदल करावे लागतात. संतोषी बॉडी पाहून अनेक जण असे देखील म्हणत आहे की त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठीच तो एवढी मेहनत घेत आहे. तसेच यासाठी तो त्याच्या फिटनेसकडे सर्वाधिक लक्ष देत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या फोटोवर एक कमेंट आली आहे ज्यामध्ये एका युजरने म्हटला आहे की “तू अगदी सुपर हॉट दिसतोस.”

दिवसांपूर्वीच त्याचा हिडन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये देखील त्याला खूप यश मिळाले. कोरोना महामारीच्या काळात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करण्यात आला होता. संतोष जुवेकर ने मराठी सिने विश्वात यशाचे मोठं शिखर गाठलेलं आहे. त्यामुळेच त्याच्याकडे आज लाखोंचा चाहता वर्ग आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *