प्रेमासाठी संजय दत्त ऋषी कपूर यांच्या जीवावर उठला होता, वाचा भयभीत करणारा किस्सा

मुंबई | प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं. प्रेमाच्या नादात केत्येक व्यक्ती आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून बसतात. याच प्रेमाच्या तावडीत येऊन, एखादी व्यक्ती कधीकधी अशी पावले उचलते ज्याचा त्याला नंतर पश्चाताप होतो. असेच काहीसे अभिनेता संजय दत्त आणि ऋषी कपूर यांच्यात घडले. या दोन्ही अभियंत्यांचा एक स्वतंत्र चाहता वर्ग आहे. आजवर या दोघांनी अभिनय क्षेत्रात खूप नाव कमवले आहे.

मात्र एक वेळ अशी होती तेव्हा प्रेमासाठी संजय दत्त ऋषी कपूर यांना मारायला निघाला होता. यावेळी या दोघामध्ये खूप भांडणे झाली होती. चित्रपटात एका हिरोईन साठी दोन हिरो जसे एकमेकांच्या जीवावर उठतात तशीच या दोघांची भांडणे झाली होती. तर आता या दोघांच्या आयुष्यात आलेली ती अभिनेत्री आहे तरी कोण हे जाणून घेऊ.

संजय दत्त टीना मुनीमसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यावेळी त्याचा गैरसमज झाला की ऋषी कपूर देखील टीना मुनीमच्या अफेअरमध्ये आहेत. ऋषी कपूर यांनी नुकत्याच रिलीज झालेल्या त्यांच्या आत्मचरित्रात याचा खुलासा केला आहे.

ऋषी कपूर आणि टीना खूप जवळचे मित्र होते. दोघांनी ‘कर्ज’ या चित्रपटाव्यतिरिक्त इतर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पण संजय दत्तला दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे असे वाटू लागले. इच्छा असूनही तो टीनाला याबाबत विचारू शकला नाही. मात्र त्याच्या मनातला संशय वाढतच होता. संशय हा नेहमीच धोकादायक ठरला आहे.

संजय दत्त टीना आणि गुलशन ग्रोवरसोबत ‘रॉकी’ चित्रपटात काम करत होता आणि याच दरम्यान त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली. नंतर त्याचा संशय अधिक वाढत गेल्यामुळे त्याने एक दिवस रागाच्या भरात एक मोठा निर्णय घेतला. त्याने गुलशन ग्रोवरसोबत ऋषी कपूरला मारहाण करण्याचा प्लॅन बनवला आणि तो नीतूच्या घराकडे निघाला.

त्यावेळी नीतू ऋषी कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. टीना मुनीममुळे ऋषी कपूरला मारहाण करण्याच्या उद्देशाने संजय दत्त आणि गुलशन आल्याचे तिला समजताच ती शांत झाली आणि संजयची समजूत काढू लागली. तिने सांगितले की, ऋषी आणि टीना यांच्यात काहीही चालू नाही आणि ज्या बातम्या येत आहेत त्या फक्त अफवा आहेत. चित्रपटसृष्टीत असल्याने त्यांना एकमेकांवर विश्वास ठेवायला लागला. नंतर त्याचा राग शांत झाला.

ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात असाही खुलासा केला की, जेव्हा संजू नीतूच्या घरी पोहोचला तेव्हा तो ड्रग्स घेत होता. पण ऋषी कपूर आणि नीतू यांचे लग्न झाल्यावर सर्व अफवा संपल्या. तसेच या वादाला पूर्णविराम लागला.

मात्र संजय दत्त आणि ऋषी कपूर यांच्या नात्यात काही काळ दुरावा निर्माण झाला होता. पण नंतर सर्व काही सुरळीत झाले. यानंतर दोघांनीही काही चित्रपटात एकत्र काम देखील केले.आता त्याच्यात कोणताच वाद नाही. मात्र तरी देखील त्यांचा हा किस्सा नेहमीच आठवणीत राहण्यासारखा आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *