अभिनेत्रींनाही मागे सारेल एवढी सुंदर दिसते आर्चीच्या सैराट मधील वडिलांची खऱ्या आयुष्यातली पत्नी!

मुंबई | फॅन्ड्री या चित्रपटाला मिळालेल्या अभतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांनी आणखीन एक ब्लॉकबस्टर चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला दिला. सैराट चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणण्यापेक्षा हा एक छप्पर फाड चित्रपट होता असं म्हणल्यास वावग ठरणार नाही. कारण या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. अशात चित्रपटातील आर्ची, परश्या, लंगड्या आणि सल्या यांच्याबरोबरच इतरही सर्व कलाकारांनी दमदार अभिनय केला. चित्रपटातील आर्चीच्या वडिलांची भूमिका देखील चांगलीच गाजली.

“कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे….” हा डायलॉग विशेष हिट झाला. आर्चीच्या वडिलांची भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी साकारली आहे. चित्रपटात त्यांना काही मोजके डायलॉग होते मात्र त्यातही “कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे….” या डायलॉगने चांगलीच हवा केली. अशात सुरेश यांनी या आधी देखील अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे. मात्र त्यांना सैराटने मोठ्या प्रकाश झोतात आणले.

या चित्रपटामुळे त्यांचा चाहता वर्ग दुपटीने वाढला. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी जाणून घेण्याची देखील उत्सुकता असते. अशात आज आपण या बातमीतून त्यांच्या पत्नी विषयी माहिती घेणार आहोत. सूरज यांच्या पत्नीचे नाव विद्या विश्वकर्मा असे आहे. त्या मनोरंजनाच्या दूनियेपासून खूप दूर आहेत. अशात त्यांचे काही फोटो सोशल मीडिया व्हायरल झालेत.

यामध्ये सुरेश आणि विद्या दोघेही एकमेकांबरोबर पोज देत उभे आहेत. एका फोटोमध्ये दोघांनी देखील लाला आणि काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. यामध्ये सुरेश यांची पत्नी विद्या खूप सुंदर दिसत आहेत. नाजूक बांधा आणि सुंदर असा चेहरा पाहून अनेक जण त्यांचे देखील फॅन झाले आहेत. सुंदरतेच्या बाबतीत विद्या यांनी अगदी एखाद्या अभिनेत्रीला देखील मागे सारले आहे.

या दोघांचे हे फोटो व्हायरल होतं असून अनेक जण त्यांना वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. किती सुंदर, खूप गोड अशा अनेक कमेंट त्यांना देत आहेत. तसेच या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा मोठा वर्षाव केला आहे. सुरेश आणि विद्या यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव ओवी असे आहे. हे दोघेही आपल्या सुखी संसारात खूप खुश आहेत.

सुरेश यांच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी बोलायचे झाल्यास त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर गावाहून मुंबई गाठली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील स्ट्रगल सुरू झाले. आभिनायची आवड जोपासत आजवर त्यांनी मालिका चित्रपट आणि नाटकच नाहीतर अनेक पथनाट्य देखील केली आहेत.

सैराट या चित्रपटाने त्यांना विशेष पसंती मिळाली. याशिवाय त्यांनी रेगे, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. तसेच लोकनाट्यांमध्ये मावशी आणि सोंगाड्यापासून विविध पात्रे त्यांनी साकारली आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *