दुःखद! प्रसिध्द अभिनेत्रीची प्रकृती खुपचं गंभीर; किडनी निकामी झाल्याने रुग्णालयात दाखल

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अनेक दिग्गजांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अनेक बडे कलाकार या जगाला सोडून गेले आहेत. यात लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी, केके आणि राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

राजू श्रीवास्तव तर अनेक दिवस रूग्णालयात उपचार घेत असून देखील त्यांची प्रकृती सुधारली नाही. आणि त्यांचे निधन झाले आहे. व्यायाम करत असताना राजू हृदयविकाराचां झटका आला, त्यानंतर त्यांना दिल्लीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृति सुधारत नव्हती.

 

 

 

दिवसेंदिवस त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत होता. अनेक डॉक्टर त्यांच्यावर उपचार घेत होते. राजू यांनी आयुष्यभर जगाला हसवलं. मात्र त्यांच्या निधनाने पूर्ण जगाला त्यांनी रडवल आहे. सध्या त्यांच्या निधनाची बातमी ताजी असताना अभिनय क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

 

 

प्रसिध्द अभिनेत्रीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. शूटिंग दरम्यान सदर अभिनेत्रीला चक्कर आली आणि त्यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृति गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

 

अभिनेत्रीचे नाव अनाया सोनी असे आहे. अनया ही मेरे साई या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचली, मात्र सध्या तिच्यावर खूप वाईट प्रसंग आला आहे. मालिकेची शुट्टींग सुरू असताना अनया चक्कर येऊन खाली पडली त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिच्या प्रकृतीत खुपचं बिघाड झाला.

 

 

डॉक्टरांनी तिच्या खाही टेस्ट केल्या आणि तिची एक किडनी निकामी होत असल्याची माहिती तिला दिली आहे. त्यामुळे सदर अभिनेत्री मोठ्या चिंतेत पडली आहे. सध्या ती डायलिसिस करत आहे. मात्र तिच्याकडे उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. याबाबत तिने स्वतः इंस्टाग्राम वर चाहत्यांना माहिती दिली आहे.

 

लवकरच ती किडनी प्रत्यारोपण करणार आहे. असे देखील तिने इंस्टाग्राम पोस्ट मध्ये सांगितले आहे. मात्र सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा येत नसल्याने चाहत्यांमध्ये देखील चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक चाहते ती बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *