दुःखद! सलमान खानची अचानक प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

 

बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या सलमान खानला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण पसरले आहे. सलमान खान हा अत्यंत प्रसिध्द अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने आत्तापर्यंत 200हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.

मात्र त्याची अचानक प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्याला एका रुग्णालयात दाखल केले आहे. त्याने त्याच्या आगामी येणाऱ्या चित्रपटाचे शूटिंग देखील काही काळासाठी थांबवले आहे. तसेच त्याने बीग बॉसचे शुट्टिंग देखील थांबवले आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

सलमान खान याला डेंग्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंग दरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानतंर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने आपल्या अभिनयाने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

त्यामुळे त्याचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. मात्र सध्या त्याची प्रकृति स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नामांकित डॉक्टर त्याच्यावर सध्या उपचार करत आहेत. पुढील काही दिवस शूटिंग बंद राहणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *