दुःखद! प्लास्टिक सर्जरी करणं अभिनेत्रीला पडलं महागात; 27 वर्षीय अभिनेत्रीचे अखेर निधन

बंगळूर | भारतात अनेक अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केलेली. यात शिल्पा शेट्टीच नाव सर्वांना माहीत आहे.तसेच प्रियंका चोप्रान देखील प्लास्टिक सर्जरी केलीय. आता ती हॉलिवूडमध्ये काम करत आहे.अशाचप्रकारे कन्नड अभिनेत्री चेतना राजनही प्लास्टिक सर्जरी केली. कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी करताना तिचं निधन झाल.

त्यांना 16 मे रोजी फॅटमुक्त प्लास्टिक सर्जरीसाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. संध्याकाळी अचानक चेतनाची तब्येत बिघडू लागली तिच्या फुफ्फुसात पाणी साचल त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप:
चेतना राज गीता आणि दोरेसानी यांसारख्या मालिकांमध्ये दिसायची. 16 मे रोजी त्यांनी कर्नाटकातील बेंगळुरू येथील राजाजीनगर येथील शेट्टी हॉस्पिटलमध्ये चरबीमुक्त प्लास्टिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची शस्त्रक्रिया चांगली झाली नाही. चेतनाचे पालक डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. शस्त्रक्रियेतील चुकीमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याच त्यांच म्हणण आहे.

त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, असा दावा केला जात आहे की चेतनाने तिच्या शस्त्रक्रियेची बाब तिच्या पालकांपासून लपवली होती. त्याला शस्त्रक्रियेबद्दल माहिती नव्हती. तिला तिच्या मैत्रिणींसह रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयाविरोधात नोंदवला एफआरआय – चेतनाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी डॉक्टर आणि रुग्णालयाविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेतनाला कोणीतरी वजन कमी करण्यास सांगितल होत.

वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने फॅट काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. शस्त्रक्रियेनंतर त्याच्या फुफ्फुसात पाणी साचल होत. हॉस्पिटलमध्ये आयसीयू वॉर्ड नव्हता, त्यामुळ तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल त्याचवेळी तिला मृत घोषित करण्यात आलय.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *