Fack check | बॉलीवूड अभिनेता शरमन जोशी काळाच्या पडद्याआड?

दिल्ली| गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलीवूड कलाकारांच्या मृत्यच्या बातम्या समोर येत आहेत. अशात काही दिवसांपूर्वीच प्रेम चोपडा यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर समजले की, ही फक्त एक अफवा होती. ते अगदी व्यवस्थीत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबातील मोठ्या अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. त्या अभिनेत्याचे नाव ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल.

प्रेम चोपडा यांचा जावई शरमन जोशी याचे निधन झाले असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. मात्र ही देखील एक अफवा आहे. ही अफवा सोशल मीडियावर खूप जोरदार व्हायरल होतं आहे. अनेक व्यक्ती मोठ्या पेचात पडले आहेत. ही खरच एक अफवा आहे की, खरोखर असे घडले आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरमन जोशी अगदी धडधाकट आहे. त्याला काहीच झालेले नाही. गुजराती अभिनेते अरविंद जोशी हे शरमनचे वडील आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी शरमनने प्रेम चोपडा यांची मुलगी प्रेरणा चोपडा बरोबर लग्न केले. तेव्हा पासून हे दोघे आपल्या सुखी संसारात खुश आहेतं. यांना तीन आपत्य देखील आहेत. साल २००५ मध्ये त्यांनी ख्याना जोशी या मुलीला जन्म दिला. तसेच साल २००९ मध्ये प्रेरणाने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. विहान जोशी आणि वरयान जोशी अशी त्याच्या दोन्ही मुलांची नावे आहेत.

शरमनने आजवर बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. साल १९९९ मध्ये त्याने बॉलीवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. ‘गॉडमदर’ हा त्याचा प्रथम चित्रपट होता. त्यानंतर त्याने ‘स्टाइल’, ‘रंग दे बसंती’, ‘गोलमाल’, ‘लाइन इन अ मेट्रो’, ‘ढोल’, ‘3 इडियट्स’, ‘हेट स्टोरी 3’, ‘मिशन मंगल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘3 इडियट्स’ या चित्रपटात त्याने राजू हे पात्र साकारले होते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.

मात्र सर्व चांगले सुरू असताना मध्येच त्याच्या मृत्यूची बातमी आली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर देखील एकच खळबळ उडाली. असा प्रकार प्रेम चोपडा यांच्या बरोबर देखील घडला होता. त्यावेळीं त्यांनी स्वतः समोर येऊन हे खोटं असल्याचे सांगितले होते. आता शरमन विषयीचे हे वृत्त वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतं आहे. मात्र त्याने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *