दुःखद! MPSC चा अभ्यास करणाऱ्या तरुणीचे निधन; अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण, वाचून डोळ्यात पाणी येईल

पुणे | पुणे शहर हे शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखल जात आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. परंतु याच पुणे शहरात सोलापूर जिल्ह्यातून एक मुलगी शिक्षणासाठी आली होती. ती एम.पी.एस.सी करत होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांवर अधिकच ताण असलेला पहायला मिळतो. यामुळेच या तणावान तिला हृदयविकाराचा झटका आला.

पूजा वसंत राठोड (वय 25) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पूजा ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील कोंडी तांडा या गावातील आहे. पूजाचे बीएससी पर्यंतचे शिक्षण हे संगमेश्वर येथे झाले तर पदव्युत्तर शिक्षण पुण्यात झाले. पूजा पुण्यात टाटा कन्सल्टिंग सर्विसेसमध्ये नोकरी करत होती. नोकरी करत असताना पूजा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील करत होती. पूजाची लहान बहीण देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करते, तर भाऊ बंगळरु येथील एका कंपनीत नोकरी करतो.

मंगळवारी पूजा हो वडगाव शेरी येथील श्री स्टडी सेंटर येथे अभ्यासिकेला गेली होती. अचानक तिला हृदय विकाराचा झटका आला. ती जाग्यावर कोसळून पडली. त्यानंतर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ती मृत पावली आहे अस डॉक्टरांनी सांगितलं. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. पूजाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना अभ्यासिकेतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. परवा बुधवार(28 सप्टेंबर) रोजी पूजा राठोड हिचे मुळगाव असलेल्या कोंडी तांडा येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय हुशार आणि होतकरु असलेल्या पूजाच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *