दुःखद! महेश बाबू यांच्यावर दुःखाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

दिल्ली:गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील दिग्गज मान्यवर जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गजांनी चित्रपट सृष्टीला कायमचा राम राम ठोकला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अनेक मान्यवर या जगाचा निरोप घेत आहेत. आता देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

 

 

प्रसिध्द अभिनेता महेश बाबू याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यामुळे तो सध्या मोठ्या दुःखात आहे. महेश बाबू याची आई इंदिरा यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे हैद्राबाद मधील एका नामांकित रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.

 

 

मात्र दिवसेंदिवस त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याच्या ऐवजी बिघाड होत गेला आणि आणि अखेर महेश बाबू यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे महेश बाबू हे मोठ्या शोक सागरात पडले आहेत. 2022 वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या भावाचे निधन झाले होते.

 

मात्र आता आईचे निधन झाल्याने त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे. महेश बाबू हा एक अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. अभिनय क्षेत्रातील तो खूप महागडा अभिनेता आहे. त्यांच्या आईच्या निधनाने अनेक दिग्गज मान्यवरांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *