सचिन तेंडुलकरचा जवळचा मित्र आणि भारताचा माजी क्रिकेपटूवर आलीय खुपचं वाईट वेळ

मुंबई | क्रीडा विश्वातील एका माजी क्रिकेटपटू विषयी एक वाईट बातमी समोर आली आहे. आर्थिक संकट ओढवल्याने या क्रिकेटरला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बरोबर त्यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. एकेकाळी लाखोंची कमाई करणाऱ्या या खेळाडूला आता मोठी आर्थिक चणचण भासत आहे.

विनोद कांबळी असे माजी क्रिकेटपटूंचे नाव आहे. त्यांनी भारतासाठी १७ कसोटी सामने खेळले असून यात २४७७ धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय १०४ सामन्यात १०८४ धाव केल्या आहेत. भारतासाठी एवढी कामगिरी करणारे विनोद मोठ्या आर्थिक संकटात आहेत. यामुळे ते मदत मागत आहेत.

विनोद यांची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली असल्याने त्यांनी मैदानावर मिळेल ते काम करण्याची तयारी दाखवली आहे. कारण त्यांच्या कुटुंबाचा खर्च त्यांना भागवणे कठीण झाले आहे. ते सध्या वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी शोधत आहेत. मात्र कुणीच त्यांना काम देत नाही. त्यामुळे सध्या ते बेरोजगार आहेत.

बीसीसीआय कडून त्यांना जी पेन्शन मिळते त्यात त्यांचा संसार चालत नाही. त्यामुळे ते काम शोधत आहेत. त्यांना बीसीसीआय कडून दर महा ३०,००० रुपये पेन्शन मिळते. मात्र ही त्यांना अपुरी पडत आहे. त्यामुळेच ते काम शोधत आहेत. याची माहिती त्यांनी बीसीसीआयला देखील दिली आहे.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या बाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले की, ” सध्या मी एक सेवानिवृत्त क्रिकेटर आहे. मला बीसीसीआय कडून जी पेन्शन मिळते त्यावर माझा उदरनिर्वाह होत आहे. यासाठी मी नेहमी बीसीसीआयचा आभारी असेल. मात्र आता मला कामाची गरज आहे. मी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. ”

मुलाखतीत पुढे त्यांनी सांगितले की, ” मुंबईचे अमोल मजुमदार यांना बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले असल्याची मला कल्पना आहे. मी देखील त्यांना माझी गरज भासल्यास कर्त्यव्यात हजर राहील. माझ्या परिस्थितीबद्दल मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला देखील सांगितले आहे. मुंबईसाठी मी खूप सामने खेळले आहेत त्यामुळे माझा विचार केला जाईल अशी मला आशा आहे. ” असे विनोद कांबळी यांनी सांगितले आहे.

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या दोघांची क्रिकेट विश्वातील कारकीर्द एकत्रच सुरू झाली. 18 जानेवारी 1972 रोजी विनोद यांचा जन्म झाला. क्रिकेट विश्वातील आवड लक्षात घेता सचिन तेंडुलकर बरोबर रमाकांत आचरेकर यांच्याकडे त्यांनी क्रिकेटचे ज्ञान घेतले. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे या दोघांमध्ये विनोद क्रिकेटमध्ये अधिक सरस असल्याचे अनेक वेळा त्यांच्या गुरुंनी मान्य केले आहे.

मात्र असे असले तरी सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवत वेगवेगळे विक्रम नोंदवले आहेत. विनोद कांबळी यांनी देखील क्रिकेट विश्वात दमदार कामगिरी केली आहे. मात्र सचिनप्रमाणे त्यांना मैदान जास्त गाजवता आले नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *