रोहित शर्माचा लाजीरवाणा रेकॉर्ड; त्या यादीत जगात अव्वल स्थानी

मुंबई | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना इंदोर येथे झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेन तुफानी फलंदाजी करत 227 धावा उभारल्या. या सामन्यात भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तो या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. तो मालिकेत दुसऱ्यांदा खातेह न खोलताच तंबूच्या आश्रयाला परतला. यासोबतच अनेक नकोसे विक्रम त्याने आपल्या नावावर केलेत.

दक्षिण आफ्रिकेने रायली रूसोचे शानदार शतक व क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावर 3 बाद 227 धावा काढल्या. भारतीय संघाला चांगल्या सलामीची अपेक्षा होती. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह रिषभ पंत सलामीला आला. दक्षिण आफ्रिकेसाठी पहिले शतक अनुभवी गोलंदाज कगिसो रबाडाने टाकल.

रबाडान टाकलेल्या चेंडूवर रोहित तो चेंडू सोडायला जात होता. परंतु बॅटची इनर एज घेत चेंडू सरळ स्टंपवर आदळला. मालिकेत दुसऱ्यांदा रबाडाने त्याला शून्यावर बाद केले. या शून्यासोबतच रोहित भारताकडून सर्वाधिक वेळा टी20 क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला. तो 10 व्यांदा खाते खोलू शकला नाही. या यादीमध्ये केएल राहुल 5 वेळा शून्यावर बाद होत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला विराट कोहली 4 वेळा झाला आहे.

कर्णधार रोहित शर्मान विराटला ही टाकल मागे – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ठरला सरस – कर्णधार म्हणून देखील T 20 क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत रोहितन विराटला मागे टाकले. रोहित चौथ्यांदा तर विराट तीन वेळा शून्यावर बाद झाला होता. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 62 सामन्यात भारताचे नेतृत्व करताना एकदाही शून्यावर तंबूचा रस्ता धरला नव्हता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *