बुमराह बाबत रोहीत शर्मा स्पष्टच बोलला; म्हणाला…

मुंबई | काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना झाला होता. तेव्हा भारतानं 2 – 1 ने चांगली खेळी खेळत सीरिजमध्ये विजय संपादन केलाय. आता 16 ऑक्टोंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा T-20 सामना लवकरच सुरू होईल. या सीरिजमध्ये बुमराह गोलंदाजी करेल अस वाटल होत. परंतु कमरेच्या अजारान तो अजूनच खचला आहे. त्यामुळं ही सिरीज तो खेळणार नाही. यावर भारतीय संघनायक रोहित शर्मान मौन सोडलंय.

अनेक खेळाडू ऑस्ट्रेलियात सामने खेळले नाहीत. यासाठी आम्ही पहिले तिकडे जात आहोत. आम्ही पर्थच्या बाऊंसी पिचवर खेळू आणि नंतर काय करता येईल हे पाहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जसप्रीत बुमराह हा विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग होता. परंतु दुखापतीमुळे तो बाहेर पडल्यानंतर आता त्याच्याऐवजी कोणाला संघात संधी द्यायची हे बीसीसीआय आणि व्यवस्थापनासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि बाऊंसी ट्रॅकवर बुमराहची कमतरता कोणता गोलंदाज भरून काढू शकतो हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे.15 पैकी 7-8 खेळाडू याआधी ऑस्ट्रेलियात गेले आहेत. आम्ही तेथे काही सराव सामने खेळू. बुमराह संघात नसणं हा मोठा फटका आहे, पण आमच्याकडे काही खेळाडू आहेत जे त्याची जागा घेऊ शकतात.

ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असं रोहित शर्मानं यावेळी स्पष्ट केलं. अनेक खेळाडू ऑस्ट्रेलियात सामने खेळले नाहीत. यासाठी आम्ही पहिले तिकडे जात आहोत. आम्ही पर्थच्या बाऊंसी पिचवर खेळू आणि नंतर काय करता येईल हे पाहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *