रोहित – रिषभची जोडी अपयशी ठरली; सूर्यकुमारने लाज राखली, विराटने बाहेर बसून…

दिल्ली | ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी- 20 वर्ल्डकपसाठीचे टीम इंडियाचे मिशन सुरू झाले आहे. भारतीय क्रिकेट संघान सोमवारी पहिली ऑफिशियल वॉर्म अप मॅच खेळली. पर्थ येथे झालेल्या या सामन्यात भारताने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघावर 13 धावांनी विजय मिळवला. वर्ल्डकपसाठी रंगतदार सुरुवात झाली. टी-20 वर्ल्डकपच्या आधी भारत दोन अनऑफिशिअल आणि दोन ऑफिशिअल मॅच खेळणार आहे.

पहिल्या सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आणि विजय मिळवला. भारताकडून अर्शदीप सिंगन 3, भुवनेश्वरन 2 तर हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहलन प्रत्येकी 1 विकेट मिळवली. भारतान प्रथम फलंदाजी करत 6 बाद 158 धावा केल्या होत्या. भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत सलामीला आले होते. हे दोघेही झटपट बाद झाले, रोहित फक्त 3 तर पंत 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर दीपक हुड्डा 22 धावांवर माघारी परतला.

आघाडीची फलंदाजी लवकर बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी धावांचा वेग वाढवला. मात्र 100 धावांच्या आत भारताला चौथा धक्का बसला, हार्दिक पंड्या 27 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 52 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला.

संकटमोचक सूर्यकुमार – सूर्यकुमारने 35 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 52 धावा केल्या. सूर्यकुमारच्या या खेळीने भारताला समाधानकारक धावसंख्या उभी करता आली. टी-20 वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमारचा हा फॉर्म टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरणार आहे.

  • टी-20 वर्ल्डकपच्या आधी भारताच्या वॉर्म अप मॅच – 
    12 ऑक्टोबर- भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
    17 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
    19 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड
Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *