बापरे रितेश देशमुख एवढा रागवला की, ती बॉटल त्याने….

मुंबई | प्रत्येक कलाकारांमध्ये अभिनयासह एक विनोदी बुद्धी सुद्धा असते. अनेक जण सोशल मीडिया मार्फत आपले विनोदी बुद्धी चाहत्यांसमोर आणत असतात. अनेक जण वेगवेगळ्या व्हिडिओ बनवून आपले विनोद सादर करता. अशात रितेश देशमुख हा अभिनेता सुद्धा विनोद करण्यात मागे नाही. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या चहा त्यांना वेगवेगळ्या कारणांवरून हसतवत असतो. तो कधी आपल्या मुलांबरोबर मस्ती करताना दिसतो तर कधी पत्नी जिनेलिया बरोबर मस्ती करताना दिसतो. अशा दादा त्याचा एक मजेशीर विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रितेश खूप रागावलेला दिसतो आहे मात्र त्याला पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. चला तर जाणून घेऊ नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये.

सेट वरती शूटिंग करण्याआधी प्रत्येक कलाकाराला मेकअप करावा लागतो. बघा मेकअप फक्त अभिनेत्रीच करतात असं नाही अभिनेत्यांना सुद्धा थोडाफार मेकअप दिला जातो. अशाच सेट वरती शूटिंग सुरू होण्याआधी मेकअप करत असताना मेकअप आर्टिस्ट रितेश चे केस विंचरत असतो. यासाठी पहिल्यांदा तो व्यक्ती रितेशच्या डोक्यावर पाण्याचा फवारा मारतो. थांबतच नाहीये असं समजल्यावर रितेश त्याच्या हातातून पाण्याची बॉटल घेतो आणि ती बॉटल उघडून त्यातील संपूर्ण पाणी स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतो. त्यानंतर पुन्हा एकदा तो व्यक्ती रितेशच्या डोक्यावर पाण्याचा फवारा मारू लागतो. रितेश ला पुन्हा खूप राग येतो आणि तो परत एकदा संपूर्ण पाण्याची बॉटल स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतो.

रितेशला आलेला राग स्वाभाविक आहे. कदाचित तुमच्यापैकी किती जणांना सलून मध्ये गेल्यावरती अशा पद्धतीचा अनुभव आलाच असेल. मात्र आपण त्यावेळी काहीच करू शकत नाही. पण रितेशने जसं केला आहे तसं करण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. असाच त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. रितेशने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच त्याला कॅप्शन देत लिहिले आहे की, ” शूट साठी रेडी होण्याआधीचे काही सीन.” हा व्हिडिओ पाहून चाहते खदखदून हसत आहेत. वायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रितेशच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन खरोखरच बघण्याजोगे आहेत. त्याचे एक्सप्रेशन पाहूनच खूप हसायला येत आहे.

रितेश सोशल मीडियावर सतत आज काही ना काही कारणावरून विनोद करत असतो. या मराठमोळ्या मुलाने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात विनोदी अभिनय केला आहे. ज्यामध्ये मस्ती आणि हाउसफुल असे चित्रपट खूप गाजले. साल 2023 मध्ये त्याचे काकुदा, विस्फोट, प्लॅन ए प्लॅन बी, मिस्टर मम्मी, क्या टोटल कुल है हम असे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *