रेखा यांची बहिण दिसते खुपचं सुंदर; करते हे काम

मुंबई | बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांचा आजही बॉलीवूडवर वचक कायम आहे. त्यांच्या काळात त्यांनी केलेल्या अभिनयाचे आजही लाखो दिवाणे आहेत. रेखा यांचे वयक्तिक आयुष्य आजही चर्चेत असते. सध्या त्या अभिनयात सक्रिय नाहीत मात्र तरी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल ऐकायला अनेक चाहत्यांना आवडते.

रेखा यांना एक बहिण आहे. त्यांची बहीण देखील अभिनय क्षेत्रात काम करणार होती. मात्र तसे होऊ शकले नाही. कारण अभिनया पेक्षा त्यांच्या बहिणीला मॉडेलिंग जास्त आवडत होती. चित्रपटात काम करणे हे त्यांना आवडत नव्हते. त्यामुळे बॉलीवूडच्या एका मोठ्या चित्रपटाची ऑफर त्यांनी स्वतः नाकारली होती. आज या बातमीमधून रेखा यांची बहीण राधा यांच्या विषयी जाणून घेऊ.

रेखा यांच्या सुंदरतेचे आजही लाखो दिवाणे आहेत. त्यांची बहीण राधा देखील दिसायला खूप देखणी आहे. साल २०२० मध्ये या दोन बहिणी एका कार्यक्रमात एकत्र आल्या होत्या. यावेळी सर्वच कॅमेरे या दोघींच्या दिशेने वळले. दोघी बहिणी एकत्र खूप छान दिसत होत्या. यावेळी दोघींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा या दोघींचे फोटो समोर आले आहेत.

राधा यांनी काही साऊथ चित्रपटांमध्ये अभिनय केल्याचे म्हटले जाते. त्यांना बॉलीवूडमध्ये देखील अनेक बिग बजेट चित्रपटाच्या ऑफर आल्या होत्या. मात्र त्यांनी त्या नाकारल्या. रेखाला राज कपूर यांच्या चित्रपटाची देखील ऑफर आली होती. बॉबी या चित्रपटात डिंपल कपाडिया ऐवजी राधा दिसणार होत्या. मात्र त्यांनी तो चित्रपट नाकारला त्यामुळे डिंपल यांनी यातून मोठी प्रसिद्धी मिळवली.

बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर मॉडल उस्मान सईद यांच्या बरोबर राधा यांनी विवाह केला. ते प्रसिद्ध लेखक एसएम अब्बास यांचे पुत्र आहेत. लग्नानंतर राधा यांनी आपल्या अभिनयाच्या करिअरला ब्रेक दिला. नंतर त्या आपल्या पती बरोबर अमेरिकेत स्थायिक झाल्या. रेखा आणि राधा या दोघी सख्या बहिणी आहेत. त्यांना अन्य चार बहिणी देखील आहेत. मात्र त्या सावत्र आहेत.

रेखा यांच्या आईचे दोन वेळा लग्न झाले होते. त्यांना पहिल्या पती कडून रेखा आणि राधा या दोन मुली आहेत. तर रेखा यांच्या बाकीच्या सावत्र बहिणीची नावे जया श्रीधर, विजया चामुंडेश्वरी, रेवती स्वामीनाथन, नारायणी गणेशन अशी आहेत. या सर्वच बहिणी अनेक कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आलेल्या आहेत.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *