रीमा लागू यांची मुलगी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी दमदार गाजवली आहे. त्यातीलच एक रीमा लागू. रीमा लागू यांनी त्यांच्या अभिनयाने आई ही भूमिका प्रत्येक चित्रपटात अगदी उत्तम साकारली. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. ‘साजन’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘येस बॉस’ आणि ‘मैने प्यार किया’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये त्या आईच्या भूमिकेतून भूमिकेत दिसल्या आहेत.

रीमा यांच्या आई देखील एक अभिनेत्री होत्या. मंदाकिनी भडभडे असे त्यांच्या आईचे नाव होते. त्यांनी देखील अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी गेली होती. अशात आता त्यांची तिसरी पिढी म्हणजे रीमा यांची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ती दिसायला देखील कमालीची सुंदर आहे. तिच्या सुंदरते बरोबरच तिच्या अभिनयाचे देखील भरपूर चाहते आहेत. आज आपण रीमा लागू यांची मुलगी मृण्मयी बद्दल जाणून घेणार आहोत.

आईप्रमाणेच मृण्मयी लागूनेही तिच्या करिअरसाठी चित्रपटसृष्टी निवडली. आई आणि मुलगी असण्यासोबतच रीमा आणि मृण्मयी या दोघी चांगल्या मैत्रिणी देखील होत्या. दोघेही आपल्या मनातील खूप काही एकमेकांशी शेअर करायच्या. मृण्मयीने हॅलो जिंदगी या चित्रपटात काम केले आहे. तसेच दोघात तिसरा आता सगळं विसरा या चित्रपटात तिने प्रसार ओकच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

बायको, सातच्या आत घरात, मुक्काम पोस्ट लंडन या चित्रपटात देखील ती झळकली आहे. त्यानंतर तिने अभिनयापासून थोडा काढता पाय घेतला. मात्र ती पडद्या मागे सक्रिय आहे. तिने आता पर्यंत दिग्दर्शन आणि स्क्रिप्ट राईट क्षेत्रात नाव कमवले आहे.

मृण्मयीने ‘3 इडियट्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘पीके’, ‘तलाश’, ‘दंगल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या कलेची ताकद दाखवत दिग्दर्शन केले आहे. आमिर खान निर्मित टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’ मधून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. तिला नाटय़कलेची आवड होती आणि म्हणूनच तिने इंग्रजी आणि मराठी नाटकांमध्ये अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला.

बॉलीवूडमधील अनेक सर्वोत्तम चित्रपटांसाठी स्क्रिप्ट राईटरचे तिने काम केले आहे. ज्यात लेखक आणि सर्जनशील निर्मात्याचा समावेश आहे. पटकथा लेखक म्हणून तापसी पन्नूचा ‘थप्पड’ हा तिचा पहिला चित्रपट आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *