बॉलीवूडचा प्रसिद्ध गायकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई | आपला भारत देश आजाद होऊन आता 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त काल 15 ऑगस्ट धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य होऊन एवढा मोठा काळ लोटला असला तरी अनेक ठिकाणी स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे.

खेड्यापाड्यांमध्ये आणि मागास भागात स्त्रियांवर अन्याय अत्याचार सुरूच आहेत. त्याचप्रमाणे बॉलीवूड सारख्या ठिकाणी देखील अनेक स्त्रिया आजही अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. अशीच एक घटना एका कॉस्च्युम डिझायनर महिले बरोबर घडली आहे.

बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध गायकाने या महिलेला मोठे काम मिळवून देणार असे सांगून स्वतःच्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्याने त्या महिलेवरती बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

पीडित मुलीने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. ओशीवारा पोलीस ठाण्यात तिने गायका विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या गायकावरती 376, 323 आणि 506 या दंड सहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

राहुल जैन असे या प्रसिद्ध गायकाचे नाव आहे. बॉलीवूडमध्ये आजवर त्याने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. राहुलचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. मात्र एका कॉस्च्युम डिझायनरने त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

पीडितेने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंटवर राहुलने तिला मेसेज केला होता. त्याने तिचं काम पाहून तिला पर्सनल कॉस्च्युम डिझायनरची ऑफर दिली होती. यावेळी महिलेने ही ऑफर्स स्वीकारली. त्यानंतर त्याने तिला स्वतःच्या घरी बोलावून घेतले.

11 ऑगस्ट रोजी राहुलने त्या मुलीला स्वतःच्या फ्लॅटमध्ये बोलावून घेतले. यावेळी कापड दाखवत असताना तो तिला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. महिलेने तिच्या जबाबमध्ये पुढे सांगितले आहे की, ” राहुल मला बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर त्याने माझ्याबरोबर गैरवर्तन करायला सुरुवात केली.

त्यावेळी मी त्यांना रोखले. मात्र त्याने मला मारहाण केली. त्याचबरोबर त्याने माझ्यावर बलात्कार केला. यावेळी मी त्याला खूप रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने सर्व पुरावे नष्ट केले. तसेच बाहेर काहीही न सांगण्याची मला धमकी दिली.”

पीडितेने हे सर्व सांगितल्यानंतर राहुल जैनने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने असे म्हटले आहे की, मी या मुलीला कधी पाहिले देखील नाही. तसेच मी कधीच तिच्याशी कोणतीच बातचीत केलेली नाही. तिने केलेले हे सर्व आरोप निराधार आहेत.” असे राहुलचे म्हणणे आहे.

त्याच्यावर केलेले हे आरोप त्यानी फेटाळून लावले असले तरी त्याच्या संदर्भात आणखीन एक गुन्हा गेल्यावर्षी दाखल करण्यात आला होता. एका प्रसिद्ध महिला गीतकाराने त्याच्यावरती बळजबरी, बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

साल 2021 मध्ये त्याच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्याने अशा पद्धतीचे कृत केल्याने पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलीस अजूनही त्याची चौकशी करत असून त्याला अटक केलेली नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *