नाकातून रक्त, श्वासनाला त्रास;रणबीर कपूर देत आहे या गंभीर आजाराला झुंज

मुंबई | बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणार रणबीर कपूर हा नेहमीच लाईमलाईटमध्ये असतो. सोशल मीडियावर सध्या त्याच्या आणि आलियाच्या चर्चेला उधाण आलं आहे. या दोघांचं लग्न त्यानंतर बाळ आणि आता त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे दोघेही सतत माध्यमांवर झळकत आहेत. या सर्वामध्ये दोघे आपली लाईफ खूप एन्जॉय करत आहेत आणि खूप खुश आहेत. मात्र आता याच सुखाला विरझन लावणारी एक बातमी समोर आली आहे.

बातमी अशी आहे की, यामुळे कदाचित येत्या काही दिवसात दुःखद लाट उसळलू शकेल. रणबीर कपूरला एक दुर्मिळ आजार झाला आहे. यासाठी तो उपचार देखील घेत आहे. ये दिल है मुश्किल या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान त्याला पहिल्यांदा ‘नेजल सेप्टम डेव्हिएशन.’ या आजराची लक्षणे जाणवली होती. हा आजार सुरुवातीला तसा साधा वाटत असला तरी वेळीच काळजी न घेतल्यास याचे पुढे मोठे गंभीर परिणाम होऊ शकतात.

अशात आता रणबीरला या आजाराची लक्षणे जाणवू तीव्र जाणवू लागली आहेत. त्याला थकवा जाणवतो. तसेच कधी कधी त्याच्या नाकातून रक्त देखील येते. त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होतो. नासिकेतील पडदा लहान झाल्याने त्याला श्वास घेता येत नाही. शिवाय त्याला कोणत्याच गोष्टीची सुगंध आणि दुर्गंध देखील येत नाही. त्याचे नाक काम करणेच बंद करते. रणबीरने या आजाराविषयी कधीच बोलणे टाळले नाही. तो नेहमीच या विषयी खुलेपणाने सांगत असतो.

आलिया भट्ट ही देखील नुकतीच तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपटाच्या शुटींगमध्ये दिसली होती. यावेळी तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत होते. अशात आता रणबीर आणि तिची जोडी चाहत्यांना खूप आवडते. प्रेग्नेंट असून देखील तिने मोठे कठीण सीन शूट केले आहेत. तसेच रणबीरच्या आजाराविषयी समजल्याने अनेकजण या जोडिविषयी सहानुभूती व्यक्त करत आहेत.

चाहते रणबीरच्या आजाराविषयी सोशल मीडियावर वेगवेगळी माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला हा आजार नेमका कसा झाला. तसेच आता तो यामधून कसा काय बाहेर येऊ शकेल या सर्वच प्रश्नांची उत्तरे चाहते शोधत आहेत. रणबीर साठी अनेक जण प्रार्थना देखील करत आहेत. आपला आवडता कलाकार लवकरात लवकर ठीक व्हावा अशी प्रार्थना सर्व चाहते करत आहेत. अशात रणबीरचा हा आजार ठीक देखील होऊ शकतो. यासाठी त्याला एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *