काहीराणा दा आणि पाठक बाईला चढावी लागणार कोर्टाची पायरी

मुंबई | मराठी मालिका विश्वातील गाजलेली जोडी म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी होय. या जोडीने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये पहिल्यांदा हे दोघे एकत्र झळकले. पहिल्याच मालिकेतून त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रभर वाजवला. अशात ही गाजलेली जोडी आता कोर्टकचेरीमध्ये अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

या दोघांच्या आयुष्यातील काही मुख्य घटनांमुळे हे दोघे कोर्टकचेरी करताना दिसणार आहेत. कोर्टाची पायरी भल्याभल्यांनी चढू नये असं म्हटलं जातं. मात्र तरीदेखील अक्षया आणि हार्दिक हे दोघे असं का करत आहेत? त्यांच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आला आहे, की त्यांना चक्क कोर्टकचेरी करावी लागत आहे? असे अनेक प्रश्न विचार चाहत्यांना सतावत आहेत. या बातमीतून यात सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी या दोघांनी राणादा आणि पाठक बाई या व्यक्तिरेखा साकारल्या आणि सबंध महाराष्ट्रात ते प्रसिद्ध झाले. अशात आता ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकत आहे. याच रुपेरी पडद्यावर ते कोर्टकचेऱ्या करताना दिसणार आहेत. म्हणजे हार्दिक आणि अक्षय यांचा लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “फाईल नंबर १९८ अ” असे या चित्रपटाचे नाव आहे.

या चित्रपटामध्ये १९८ अ अंतर्गत एका मुलावर गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर संपूर्ण चित्रपटाची कथा या कलमावर ती आणि त्या मुलाच्या विजयावरती आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर रिलीज झाला. मल्हार गणेश हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तसेच चित्रपटाची पटकथा श्रीधर तिवरे आणि आशिष निनगुरकर यांनी लिहिली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

अक्षया आणि हार्दिक या दोघांनी मे महिन्यात गपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला. या दोघांच्या साखरपुड्याची बातमी कळताच चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. या दोघांचे लग्न व्हावे असं हे दोघं मालिकेत असताना पासूनच चाहत्यांना वाटत होतं. साखरपुडा झाल्यानंतर हे दोघे सोशल मीडियावर आधी पेक्षा जास्त सक्रिय झाले आहेत. त्यांच्या चाहत्यावर्गामध्ये देखील भली मोठी भर पडली आहे. आता ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकते आहे. त्यामुळे दोघांना पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहायला प्रेक्षकांना खूप आवडेल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *