11 महिन्यांच्या चिमुकल्यासाठी रक्षाबंधन ठरलं अखेरचं; रक्षांधनासाठी जात असताना अपघात, 9 जण जखमी

जळगाव | जळगाव पाचोरा रस्ता येथे एका प्रवाशी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यात एक ११ महिन्याच बाळ जागीच ठार झालं आहे. एक माल वाहू वाहन भरधाव वेगाने समोर आले आणि प्रवाशी वाहनाला याची धडक लागली. यात प्रवाशी वाहन उलटे पडले. त्यात ९ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मात्र एक चिमुकल्याने जागीच प्राण सोडले आहेत. गणेश भगवान सोनवणे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

एम. एच. १५ इ. एक्स. १८३२ या क्रमांकाचे वाहन जळगाव येथून पाचोऱ्याकडे रवाना झाले होते. यावेळी खेडगाव जवळ वाहन पोहचले असता त्याला एम. एच. १९ सी. वाय. ९२२३ या क्रमाकांच्या माल वाहू एका गाडीने धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, हे प्रवाशी वाहन थेट हवेत उडून उलटे पडले.

यात अनिता भगवान सोनवणे या महिला शिरसोली येथे राहत होत्या त्यांनी शिरसोली येथून भडगाव येथे जाण्यासाठी या वाहनाची निवड केली होती. त्यात त्यांच्या बरोबर त्यांचे ११ महिन्याचे बाळ होते. रक्षाबंधन रजरी करण्यासाठी त्या माहेरी निघाल्या होत्या. मात्र या रस्त्यात त्यांच्या बाळाने त्यांची साथ अर्ध्यात सोडली आहे. गणेश सोनवणे हे ११ महिन्याचे बाळ गाडी झाली दाबले गेले. त्यामुळे त्याचा यात जीव गेला. आपल्या बाळाला पाहून त्याच्या आईने रस्त्यात टाहो फोडला आहे.

तसेच या अपघातात वाहनाचे चालक यांच्यासह अन्य नऊ व्यक्ती जखमी झाल्या आहे. जखमीची नावे पुढील प्रमाणे – भैय्या कोळी पत्ता – खेडगाव नंदीचे ता. पाचोरा, निकीता गोकुळ राठोड वय -१४ वर्षे, पत्ता – रामदेव वाडी ता. जळगांव, सुशिलाबाई धनराज राठोड, वय – ३८ वर्षे, पत्ता – रामदेववाडी ता. जळगांव, विकास सुरेश पवार, वय – २७ वर्षे, पत्ता – रामदेव वाडी ता. जळगांव

अनिता पवन चव्हाण , वय – ३८ वर्षे , पत्ता – कोकडी तांडा ता. पाचोरा, ऋषीकेश प्रदिप पंडित, वय – १६ वर्षे, पत्ता – रा. लासगाव ता. पाचोरा, अनिता भगवान सोनवणे, वय २२ वर्षे, पत्ता – दापोरा, शिरसोली, लता गोकुळ राठोड, वय – ३७ वर्षे , पत्ता – रामदेव वाडी ता. जळगांव, आदित्य विकास पवार, वय – ७ वर्षे, पत्ता – रामदेव वाडी ता. जळगांव, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथे तात्काळ धाव घेतली..

यावेळी पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे, संदिप भोई, योगेश पाटील व समीर पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमी व्यक्तींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले गेले असून मालवाहू वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *