राजू श्रीवास्तव यांची LoveStory आहे खूपच खास; वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | भन्नाट स्टँड अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना तिथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नुकतेच त्यांचा MRI केल्याचे समजले आहे. येत्या १० दिवसांत ते ठीक होऊ शकतात. अशात या दमदार विनोदी अभित्याचा अभिनय सर्वांनी पाहिला आहे. मात्र त्यांच्या लव स्टोरी बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे आज या बातमीमधून त्यांची लव स्टोरी जाणून घेऊ.

राजू श्रीवास्तव हे त्यांच्या एका भावाच्या लग्नाला गेले होते. त्यावेळी एका मुलीला पाहून ते तिच्या प्रेमात पडले. त्यांना ती खूप आवडली. मात्र आपल्या मनातील गोष्ट सांगण्यासाठी राजू यांना १२ वर्षांचा काळ लोटला. आपल्या लव स्टोरी विषयी त्यांनी स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला होता.

राजू भावाच्या लग्नात गेले होते यावेळी ते शिखा यांना पाहून पुरते घायाळ झाले होते. त्यांनी शिखा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र मनातली गोष्ट संगण्यासाठी त्यांची हिंमत होतं नव्हती. त्यानंतर त्यांना समजले की, शिखा या त्यांच्या मेहुण्याच्या मामची मुलगी आहे.

त्यानंतर त्यांनी आपल्या भावाला मनातली गोष्ट सांगितली. तसेच भावाला मदत करायला सांगितली. इटावाला येथे शिखा राहत होत्या. त्यामुळे राजू आपल्या भावांना घेऊन इटावाला येथे गेले होते. मात्र तेव्हा देखील ते शिखा यांच्याशी बोलू शकले नाही. ते खूप लाजाळू होते.

त्यावेळी त्यांच्याकडे काही काम नव्हतं. त्यामुळे शिखा नकार देईल याची भीती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी मुंबई गाठली. इथे येऊन त्यांनी स्टँड अप कॉमेडिला सुरुवात केली. हळूहळू यातून ते प्रसिद्ध झाले. त्यांनी पैसा आणि नाव दोन्ही कमवले. १९८२ साली त्यांनी मुंबईमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. प्रसिध्दी झोतात आल्यावर त्यांनी शिखा यांच्या घरी जाऊन लग्नाची मागणी टाकली. यावेळी समोरून देखील लगेच होकार मिळाला.

पुढे 17 मे 1993 रोजी शिखा आणि राजू यांचा शुभ विवाह सोहळा संपन्न झाला. राजू श्रीवास्तव यांच्या MRI मध्ये त्यांच्या मेंदूच्या नसा दबल्याचे समजले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *