राजू श्रीवास्तव यांची मुलगी झाली भावूक; दिली पहिली प्रतिक्रिया

दिल्ली | कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल ( दिनांक 22 सप्टेंबर) रोजी त्यांना दिल्लीत निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अशावेळी सर्वांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. तसेच काही कलाकार अंत्यसंस्कार करण्यासाठी दिल्लीत पोहोचले. हे सर्वांचं प्रेम आणि आपल्या वडिलांची लोकप्रियता पाहता श्रीवास्तव यांनी मुलगी भावूक झाली.

आपल्या वडिलांच्या जाण्यान श्रीवास्तव कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला. यावेळी अनेक चाहत्यांनी अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री जुही बब्बर, निर्माते कहरी बब्बर तसेच अन्य काही मंडळींनी राजू श्रीवास्तव यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. याच मंडळींना धन्यवाद म्हणत तिन पोस्ट शेअर केली आहे.

अंत्यसंस्काराला राजू श्रीवास्तव यांच्या भावाची अनुपस्थितीत:
आपल्या वडिलांची लोकप्रियता पाहून ती अगदी भारावून गेली. राजू श्रीवास्तव यांच्यावर अंत्यसंस्कार कधी करण्यात येणार? याबाबतही अंतराने पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्कारला फक्त त्यांचा भाऊ काजू श्रीवास्तव पोचू शकला नाही. त्याची प्रकृती ठिक नसल्याने त्याला कानपूरहून दिल्लीला पोहोचणं शक्य नव्हतं. राजू यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी मात्र मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.20 वाजता निधन झाले. तब्बल 42 दिवस मृत्यूशी झुंज देणारे राजू श्रीवास्तव अखेर ही लढाई हरले. त्यांच्या जाण्यानं सगळीकडे शोककळा पसरली आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन झाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *