राजू श्रीवास्तवची प्रकृती चिंताजनक, शस्त्रक्रिये नंतरही कॉमेडियन आयसीयू मध्येच…

मुंबई | प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव याला काल हृदय विकाराचा झटका आला होता. यामुळे सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे. जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआऊट करत असताना त्याला हृदय विकाराचा झटका आला. यावेळी तो ट्रेडमीलवर जागीच कोसळला. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

या बाबत अशी माहिती समोर आली होती की, त्याला ब्लोकेज झाले आहेत. त्यामुळे त्याची एन्जिओग्राफी केली गेली. मात्र अजून त्याच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच तो आयसियूमध्ये आहे. एन्जिओग्राफी केल्या नंतर देखील तो बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यामूळे चाहत्यांची चिंता अधिक वाढली आहे.

राजू श्रीवास्तव या विनोदी अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा असे सांगण्यात आले होते की, “त्याची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र तसे नसून अद्यापही तो बेशुद्ध आहे. त्याचे पीआरओ अजित सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे पल्स वाढले आहेत. तसेच त्याला लवकरच एन्जिओग्राफी करावी लागणार आहे. हृदयाला ब्लोकेज असल्याने एन्जिओग्राफी केली जाणार आहे. ” हे त्यांनी काल सांगितले होते.

अशात आता सर्व जण राजू श्रीवास्तव याला लवकरच बरे वाटावे अशी प्रार्थना करत आहेत. यात विनोदी अभिनेता सुनील पाल याने देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटल आहे की, ” राजू श्रीवास्तव यांना हृदय विकाराचा झटका आला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केलं आहे.

त्याचं प्रकृती ठीक व्हावी अशी सगळ्यांनी प्रार्थना करा.” असं त्याने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. राजू श्रीवास्तव याने आजवर अनेक स्टेज शो केले. लहापणापासूनच विनोदी अभिनयाची आवड होती. स्टेज पासून सुरू झालेली ही कारकीर्द त्याने चित्रपटांपर्यंत नेऊन ठेवली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *