राजकुमार यांची मुलगी लागली होती शाहिद कपूरच्या मागे, तिला कंटाळून शाहिदने पोलिसात केली तक्रार

मुंबई | आले किती गेले किती मात्र जानी सारखे कुणी परत दिसलेच नाही. आपल्या भारदस्त आवाजाने आणि जबरदस्त संवादाने लोकांची मने जिंकणारे राजकुमार यांना संपूर्ण बॉलीवूड जानी या नावाने ओळखत होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

साल 1952 मध्ये रंगिली या चित्रपटातून पदार्पण करणारे राज कुमार 80 च्या दशकात सर्वाधिक पुरस्कार विजेते अभिनेता होते. राज कुमार यांनी गायत्री देवीशी लग्न केले. त्यांना पुरू राज कुमार, वास्तविकता राज कुमार आणि पाणिनी राज कुमार अशी तीन मुले आहेत. आज या बातमीमधून त्यांच्या मुलीविषयी जाणून घेणार आहोत.

राज कुमार यांची मुलगी वास्तविकता पंडित ही देखील एक सुंदर अभिनेत्री आहे. तिने 1996 मध्ये चित्रपटांमध्ये पदार्पण केले. मात्र तिचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही. प्रदीर्घ संघर्षानंतरही वास्तवला यश आले नाही आणि ती फक्त स्ट्रगलर म्हणून राहिली. एवढ्या मोठ्या स्टारची मुलगी असूनही ती चित्रपटात नाव कमवू शकली नाही तर आता ती कोठे आहे काय करते या बद्दल देखील कुणालाच काहीच माहीत नाही.

वास्तविक ही स्वतः एक स्टार कीड असून देखील तिने बॉलीवूडमध्ये टिकण्यासाठी एका स्टारचा धावा केला होता. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वास्तविकता बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या मागे पडली होती. असे म्हटले जाते की ती शाहिदचा पाठलाग करायची तो जिथे तिथे ही देखील पोहचायची.

अखेर एक दिवस वैतागून शाहिदने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तिला समज दिली. तेव्हापासून ती बॉलीवूड पासून खूपच दूर गेली. आता ती कुठे आहे काय करते? हे कुणालाच माहीत नाही.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *